Repo Rate : पुन्हा ईएमआय वाढला, वाहन-गृह कर्ज महाग, RBI ने तोंडचे पाणी पळवले

Repo Rate : RBI ने रेपो दरात, वर्षातील पाचवी वाढ केल्याने तुमच्या बजेटवर त्याचा परिणाम होणार आहे..

Repo Rate : पुन्हा ईएमआय वाढला, वाहन-गृह कर्ज महाग, RBI ने तोंडचे पाणी पळवले
पुन्हा महागाईचा मारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 4:33 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) यंदा रेपो दरात पाचव्यांदा वाढ केली. आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 0.35 टक्के वाढ करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर आता 5.90 टक्क्यांहून 6.25 टक्के होणार आहे. त्याचा मोठा फटका देशातील कर्जदारांना बसणार आहे. वाहन, गृह आणि वैयक्तिक कर्जदारांना ईएमआयपोटी (EMI) जादा रक्कम खर्च करावी लागणार आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakti Kant Das) यांनी बुधवारी पतधोरण समितीच्या अहवालानंतर रेपे दरात वाढीची घोषणा केली.

आरबीआयने मे पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. आतापर्यंत रेपो दर 5.90% वर आला होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. आता रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. हा महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

हे सुद्धा वाचा

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ झाली. तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढेल. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढू शकतो. आरबीआयच्या धोरणामुळे आतापर्यंत व्याजदरात 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, देशात महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी सर्व कवायत सुरु आहे. महागाई आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असले तरी पुढील वर्षात महागाई दरात वाढ अपेक्षित आहे.

यासोबतच भारताचे सकल देशातंर्गत उत्पन्नात (GDP) वाढ होण्याची शक्यता आहे. जीडीपी वृद्धी दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी वर्तविला आहे. जागतिक संस्था आणि आर्थिक संस्थांनी मात्र कमी अंदाज वर्तविला आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.