RBI ची तीन सहकारी बँकांवर कारवाई, नियमांचे पालन न केल्याने ठोठावला दंड

द नाशिक मर्चन्ट्स कोऑपरेटिव्ह बॅंकेसह तीन सहकारी बँकांवर आरबीआयने दंडाची कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दि नाशिक मर्चन्ट्स कोऑपरेटिव्ह बॅंकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

RBI ची तीन सहकारी बँकांवर कारवाई, नियमांचे पालन न केल्याने ठोठावला दंड
RBI चा तीन सहकारी बँकांवर कारवाई, नियमांचे पालन न केल्याने ठोठावला दंडImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 12:40 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी द नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेसह तीन सहकारी बँकांना दंड (Penalty) ठोठावला आहे. नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. फ्रॉडची सूचना (Fraud) आणि निगराणी यांसदर्भात नाबार्डद्वारे ( राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक) देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने मुंबईस्थित महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वीही, गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. इंडसइंड बँकेविरोधाही कारवाई करण्यात आली होती.

या सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड

दि नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँकेसह इतर बँकांना 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेतील ठेवींचे नियोजन आणि ठेवींवरील व्याज या संदर्भात रिझर्व्ह बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारमधील बेतिया येथील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला जागरुकता कोष आणि केवायसी (KYC-know your customer)च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियम पालनातील ढिलाईमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या बँकांवरही RBI ने केली होती कारवाई

याआधीही रिझर्व्ह बँकेने नियमांच्या पालनात ढिलाई झाल्याने फेडरल बँकेला 5.72 कोटी रुपये तर बँक ऑफ इंडियाला 70 लाख रुपयांचा दंड ठोठावत कारवाई केली होती.

हे सुद्धा वाचा

तर गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला. खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच या कारवाईबद्दल माहिती दिली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच केवायसी नियमांचे पालन न केल्याने इंडसइंड बँकेविरोधातही कारवाई करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यानेच या बँकांविरोधात कारवाईचे मोठे पाऊल उचलण्यात आले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.