RBI ने महाराष्ट्रातल्या ‘या’ 2 बँकांना ठोठावला 52 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम?

आरबीआयने अकोला जिल्ह्यात असलेल्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अकोला (महाराष्ट्र) ला त्यांच्या केवायसी निकषांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 2 लाखांचा दंड देखील ठोठावला. बँकांवर असा दंड लावल्याने ग्राहकांच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नसल्याचं आरबीआयनं आधीच स्पष्ट केले होते.

RBI ने महाराष्ट्रातल्या 'या' 2 बँकांना ठोठावला 52 लाखांचा दंड, ग्राहकांवर काय परिणाम?
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 10:42 AM

नवी दिल्लीः (RBI Imposed Penalty to These Banks) : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबईतील बॉम्बे मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला 50 लाखांचा दंड ठोठावलाय. आरबीआयने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात असलेल्या सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अकोला (महाराष्ट्र) ला त्यांच्या केवायसी निकषांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल 2 लाखांचा दंड देखील ठोठावला. बँकांवर असा दंड लावल्याने ग्राहकांच्या गुंतवणुकीवर परिणाम होणार नसल्याचं आरबीआयनं आधीच स्पष्ट केले होते. “RBI च्या (सहकारी बँक ठेवींवरील व्याज दर) निर्देश, 2016 आणि सुपरवायझरी अॅक्शन फ्रेमवर्क (SAF) अंतर्गत निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बॉम्बे मर्केंटाइल बँकेवर दंड आकारण्यात आला,” असंही RBI ने एका निवेदनात म्हटले.

व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही मजबूत यंत्रणा नाही!

आरबीआयने म्हटले आहे की, 31 मार्च 2019 पर्यंत मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारावर तपासणी अहवालात असे आढळून आले आहे की, बँकेने प्रभावी तपासणीचा भाग म्हणून अलर्टसाठी एक मजबूत यंत्रणा बसवावी. तसेच संशयास्पद व्यवहारांचे निरीक्षण करण्यात बँक अयशस्वी झाली. त्यामुळे बँकेला दंड ठोठावण्यात आलाय.

‘या’ बँकेला एक कोटीचा दंड ठोठावला

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच नियामक टप्प्यातील त्रुटींसाठी सहकारी क्षेत्रातील सहकारी राबोबँक यूएला (Rabobank UA) एक कोटीचा दंड ठोठावला. मध्यवर्ती बँकेने म्हटले होते की, 31 मार्च 2020 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत पर्यवेक्षकीय मूल्यांकन वैधानिक अन्वेषण (ISE) तपासणी केली. ज्यामध्ये कंपनी बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदी आणि RBI ने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. RBI ने यासंदर्भात बँकेला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. बँकेने नोटिशीला दिलेल्या प्रतिसादानंतर वैयक्तिक सुनावणीत मिळालेले उत्तर आणि त्यानंतर बँकेने दिलेली अतिरिक्त माहिती, आरबीआयने बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि कारवाई करताना दंड ठोठावला.

कोलकाताच्या ‘या’ बँकेने दंडही ठोठावला

अलीकडेच केवायसी नियमांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने कोलकाताच्या व्हिलेज फायनान्शियल सर्व्हिसेसवर 5 लाखांचा दंडही ठोठावला. अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेला 13 लाख रुपये, अहमदाबादच्या महिला विकास सहकारी बँकेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याचेही मध्यवर्ती बँकेने सांगितले होते.

‘या’ दोन बँकांवर 53 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड

गेल्या महिन्यात आरबीआयने नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50.35 लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर गाझियाबादच्या नोएडा कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेला 3 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक तरतुदींचे पालन न केल्याबद्दल नाशिकच्या जनलक्ष्मी सहकारी बँकेला 50.35 लाख रुपयांचा दंड ठोठावला. जनलक्ष्मी सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने ‘प्राथमिक (शहरी) सहकारी बँकांद्वारे ठेवींची जागा इतर बँकांसह ठेवणे’ आणि ‘क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे (CIC) सदस्यता जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.

संबंधित बातम्या

SBI चा 44 कोटी ग्राहकांना अलर्ट; बँकेच्या ‘या’ 7 सेवा वापरू शकणार नाही, तारीख आणि वेळ काय?

LIC च्या IPO बद्दल मोठी बातमी! सरकारने उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या सर्वकाही

RBI imposes penalty Rs 52 lakh fine on 2 banks in Maharashtra

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.