नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं. (RBI ordered to banks cctv footage save and secured during demonetization)
भारतीय रिझर्व्ह बँकेने आता देशातील बँकांना 8 नोव्हेबंर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या काळातील सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवण्यास सांगतिलं आहे. बँकांच्या शाखांमधील सीसीटीवी रेकॉर्डिंग पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ठेवण्यासा सांगण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने हा आदेश नोटबंदीच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांवर कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणांना मदत व्हावी, म्हणून दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने पुढील आदेशापर्यंत बँकाना नोटबंदीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यास सांगितलं आहे. मोदी सरकारनं त्यावेळी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करुन 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारनं नोटबंदी केली तेव्हा बाजारात 15.41 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यापैकी 15.31 लाख कोटी रुपयांच्या नोटा सरकारकडे परत आल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 च्या नोटा रद्द केल्या. तर, त्याच दिवशी 500 आणि 2000 रुपयांची नवी नोट चलनात येईल, अशी घेषणा केली. नोटबंदीनंतर देशातील बँकांबाहेर जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. नोटा बदलून घेताना अनेकांना जीव गमवावा लागला होता. तर, त्यावेळी 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बदलण्यासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराबद्दल तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांच्या शाखांमधील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर https://t.co/37G39fkVTg @KishoriPednekar | #MumbaiRains | #Monsoon2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2021
संबंधित बातम्या:
10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी, वाचा सविस्तर
PHOTOS : Bitcoin चे दिवस संपले? एका दिवसात किमतीत 10 टक्क्यांची घट, हॅकिंगसोबतही नावाची चर्चा
(RBI ordered to banks cctv footage save and secured during demonetization)