मुंबई आणि बारामतीच्या ‘या’ सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

RBI | तर इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत (Advance) व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. या बँकेतही जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

मुंबई आणि बारामतीच्या 'या' सहकारी बँकेत तुमचे पैसे आहेत का? रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई
सहकारी बँकांवर मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 9:02 AM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील मोगावीरा सहकारी बँक लिमिडेटसह ( Mogaveera Co-operative Bank Limited) ती बँकावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या तिन्ही बँकांना 23 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI take action against 3 Co-operative Banks  in Maharashtra)

यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ((Indapur Urban Cooperative Bank) 10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला (The Baramati Sahakari Bank Limited) एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तपासणीत अनियमितता निदर्शनास आल्याने कारवाई

मोगावीरा सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अहवालात अनेक अनियमतता आढळून आल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. बँकेतील निष्क्रिय असलेल्या खात्यांचे अनेक वर्षांपासून ऑडिट झाले नव्हते. तसेच DEA फंडातील अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचे दिसून आले. तसेच मोगावीरा बँकेने जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था केली नव्हती.

तर इंदापूर सहकारी बँकेत आगाऊ रक्कमेबाबत (Advance) व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते. या बँकेतही जोखीम व्यवस्थापनाबाबतही कोणतीही व्यवस्था नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

यापूर्वीही कारवाई

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.

संंबंधित बातम्या:

आरबीआय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी, काय आहे विशेष? कोणत्या बॅंकांवर परिणाम होईल?

(RBI take action against 3 Co-operative Banks  in Maharashtra)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.