ATM Coin : चलनी नोटाच नाही तर चिल्लरही येणार! देशातील इतक्या शहरांमध्ये लवकरच सेवा

ATM Coin : रिझर्व्ह बँकेने आता चिल्लरची झंझट संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे टक्केवारीने चिल्लरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प आखण्यात आला. त्यामुळे चिल्लरचा कृत्रिम तुटवडा कमी होणास मदत होईल.

ATM Coin : चलनी नोटाच नाही तर चिल्लरही येणार! देशातील इतक्या शहरांमध्ये लवकरच सेवा
सुट्टी नाणी मिळणार
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 7:39 PM

नवी दिल्ली : तुम्हाला एटीएम मशीनवर (ATM Machine) चलनी नोटा मिळतात. एटीएम कार्ड स्वॅप करुन पुढील प्रक्रिया केल्यानंतर चलनी नोटा बाहेर येतात. पण आता चलनी नोटाच नाही तर कलदार, शिक्के, चिल्लर बाहेर पडणार आहे. बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक झाली. गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. गेल्या 9 महिन्यांतील ही वाढ जनतेला हैराण करणारी ठरणार आहे. क्यूआर कोड आधारित वेंडिंग मशीनचा (QR Based Coin Vending Machines) हा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.रिझर्व्ह बँकेने आता चिल्लरची झंझट संपविण्याचा विडा उचलला आहे. त्यामुळे टक्केवारीने चिल्लरचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी आता पथदर्शी प्रकल्प आखण्यात आला. त्यामुळे चिल्लरचा कृत्रिम तुटवडा कमी होणास मदत होईल.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या प्रकल्पाविषयीची माहिती दिली. त्यानुसार, वेंडिंग मशीनचा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश चिल्लर, सुट्टे नाणी उपलब्ध करुन देणे हा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरबीआय देशातील 12 शहरात ही सेवा सुरु करणार आहे.

क्युआर कोड आधारित वेंडिंग मशीनवर युपीआय द्वारे व्यवहार करता येईल. त्यानुसार, ग्राहकांना नोटांऐवजी शिक्के, सुट्टे नाणी मिळतील. हा प्रकल्प देशातील 12 शहरात सुरु करण्यात येत असला तरी ही शहरे कोणती आहेत, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

हे सुद्धा वाचा

कॉईन व्हेंडिंग मशीनवर कोणत्याही ग्राहकाला त्याच्या युपीआय ॲपच्या माध्यमातून एटीएम मशिनवरील क्यूआर कोड स्कॅन करता येईल. त्यानंतर त्याला सुट्टी नाणे मिळतील. जितक्या किंमतीची नाणी ग्राहकाला काढायची आहेत, तेवढी रक्कम त्याच्या बँक खात्यातून कपात होईल.

एटीएमवर रोख रक्कम काढताना आपण डेबिट कार्डचा वापर करतो. डेबिट कार्ड मशिनमध्ये टाकल्यानंतर इच्छित रक्कम काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की, एटीएममधून रक्कम बाहेर येते. याठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करुन युपीआयच्या माध्यमातून चिल्लर बाहेर पडले.

आरबीआयने रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका वाढला. महागाई आटोक्यात आणण्यासाठी ही कसरत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कर्ज महाग होतील. तर कर्जावरील ईएमआयमध्ये ही प्रचंड वाढ होईल.

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.