ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 

ओमायक्रॉनची छाया गडद होण्याची शक्यता लक्षात घेता, बँकांच्या छातीत धडकी भरली आहे. ओमायक्रॉनची तिसरी लाट धडकल्यास लोकांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होऊन कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची भिती आहे. त्यामुळे बँकांचा  NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ओमायक्रॉनने बँकांना धडकी, कर्ज वसुलीला ब्रेक लागण्याची शक्यता, बँक NPA 9 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज 
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:33 AM

मुंबई : ओमायक्रॉनचे संकट गडद होत असताना, बँकांना पुन्हा NPA ची चिंता सतावत आहेत. नवीन वर्षात लोकांच्या उत्पन्नांवर थेट परिणाम झाल्यास अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल. त्यामुळे कर्ज वसुलीला ब्रेक लागून  सप्टेंबर 2022 मध्ये कर्ज बुडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांवर जाऊ शकते.

रिझर्व्ह बँकेचा अंदाज काय सांगतो

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार, कोरोना वायरसचे नवे स्वरुप ओमायक्रॉनचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम दिसून येईल. बँकांचे अनुत्पादक कर्जे सप्टेंबर 2022 पर्यंत 8.1-9.5 टक्के होतील. यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात बुडित कर्जे 6.9 टक्के होते. म्हणजे जवळपास 4 टक्के रक्कम बुडीत खात्यात जाण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ

आता या सर्व घडामोडीचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होतो, ते पाहुयात. एकतर बाजारातील खेळते भांडवल कमी होईल. बँकेच्या पोर्टफोलिओवर वाईट परिणाम होईल. नवीन कर्ज घेण्यासाठी अर्ज केला असला तरी बँका हात आखडता घेतील. त्यामुळे पुन्हा व्यवहाराची पूर्ण साखळी खंडीत होईल. बाजारात खेळत्या भांडवलाचा तुटवडा जाणवेल.

आनंदावर विरजण

रिझर्व्ह बँकेने बुडीत कर्जांविषयी अहवाल सादर केला होता. त्यात बँकांचे एनपीए (NPA) अर्थात बुडीत कर्जात हे 8.2 टक्क्यांवरुन 6.9 टक्क्यांची घट झाल्याची आनंद वार्ता दिली होती. बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण सुरुवातीला 8.2 टक्के होते. मार्च 2021 मध्ये 7.3 टक्के आणि आता 6.9 टक्क्यांवर पोहचले होते. टेड्रंस अँड प्रोग्रॅम ऑन बँकिंग सेक्टरच्या यावर्षीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. बँक उत्पन्नातील स्थिरता आणि बुडीत कर्जाचे प्रमाण कमी झाल्याने बँकेच्या अनुउत्पादन खर्चात कपात नोंदविण्यात आली होती. मात्र ओमायक्रॉन हा आनंद हिरावून घेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आता एनपीए (NPA) म्हणजे काय

बँकांचा कर्ज हप्ता अथवा कर्ज रक्कम 90 दिवसांमध्ये अर्थात 3 महिन्यांत परत करण्यात आली नाही तर ही रक्कम बुडीत कर्ज म्हणून ग्राह्य धरण्यात येते. याविषयीचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने तयार केले आहे. ईएमआय (EMI)  सलग 3 महिन्यांपर्यंत भरण्यात आला नाही. तर बँक त्याला एनपीए घोषीत करते. बँकेच्या एनपीएमध्ये वाढीचा थेट परिणाम बँकेच्या पतचलनावर दिसून येतो.

ओमायक्रॉनचे वाढते संकट

भारतात ओमायक्रॉनचे संकट वाढताना दिसत आहे. एक-दोन केसवरुन हा आकडा हजाराकडे कूच करत आहे. देशात सध्या या वायरसचे एकूण 750 केस आढळल्या आहेत. देशातील 21 राज्यांत ओमायक्रॉनचा प्रभाव दिसून येत आहे महाराष्ट्रात 160 तर दिल्लीत ओमायक्रॉनचे 200 केसेसे दिसून येत आहे. सध्या भारतात कोविडचे एकूण सक्रिय 77 हजार रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या :

फार्मा कंपनीचे स्टॉक पळणार सुसाट, करा गुंतवणूक व्हा मालामाल! 

कोरोनाने लग्नाचा बेत फसला तरी मिळणार पैसे, 7500 रुपयात 10 लाखांचा लग्न  विमा; अनेक कंपन्या इन्शुरन्ससाठी मैदानात  

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.