RBI: कर्जाचे हप्ते महागणार? रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ होण्याची शक्यता!

रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.50 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे सध्या रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे.

RBI: कर्जाचे हप्ते महागणार? रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ होण्याची शक्यता!
रिझर्व्ह बँक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 9:46 AM

नवी दिल्ली, देशात महागाई सर्वसामान्यांचे लचके तोडत असतानाच त्यात आणखी एक भर पडणार आहे.  पुढील आठवड्यात कर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पॅनेल बैठकीत प्रमुख रेपो दरात (Repo Rate) 0.35 टक्‍क्‍यांची वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.50 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे सध्या रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात पुढील आठवड्यात आणखी 35 बेसिस पॉइंटची वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे. 5 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या ठरावापूर्वी बोफा सिक्युरिटीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने जुलै 2022 च्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही कठोर पाऊलं उचलणे आवश्यक आहे. या दरवाढीबरोबरच धोरणात्मक भूमिका बदलून “कॅलिब्रेटेड टाइटनिंग” केले जाईल, असे बोफा सिक्युरिटीजने चलनविषयक धोरण समितीने (MPC) ठरावापूर्वी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे, जे 5 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

RBI ने मे आणि जूनमध्ये दोन कठोर निर्णय घेत एकत्रित 0.90 टक्‍क्‍यांनी दर वाढवला आहे. एप्रिलपासूनच्या धोरणात्मक कृतींचा संदर्भ देताना, जेव्हा RBI ने स्थायी ठेव सुविधा सुरू केली, तेव्हा ब्रोकरेज कंपनीने सांगितले की, मध्यवर्ती बँकेने प्रभावीपणे दर 1.30 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत.

हे सुद्धा वाचा

“आमच्या बेस केसमध्ये, आम्ही आता RBI MPC पॉलिसी रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ करण्याचे ठरविले आहे, तो 5.25 टक्क्यांवर नेत आहोत” असे अहवालात म्हंटले आहे.  वित्तीय संस्थांची अपेक्षा आहे की, MPC आपला आर्थिक वर्ष 2023 मध्ये  ग्राहक किंमत चलनवाढ (CPI) आणि जीडीपी वाढीचा अंदाज अनुक्रमे 6.7 टक्के आणि 7.2 टक्के राखेल. महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी एमपीसी अधिक आक्रमक उपाय स्वीकारू शकते आणि जूनमध्ये 0.50 टक्के दर वाढ करू शकते.

कर्जाचे हप्ते महागणार

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जाचे हप्ते महागणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, महागाई एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांच्या आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जानेवारी 2022 पासून महागाई 6 टक्क्यांच्या वर आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.