Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई

आपल्या आयुष्यात बँकेंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलिकडच्या काळात बँक ही एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. मात्र अनेकवेळा बँकांकडून ग्राहकांची फसवणूक होते. असे प्रकार टाळण्यासाठी आता आरबीआयकडून महत्त्वपूर्ण पाऊले उचण्यात आली आहेत.

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी 'आरबीआय'चा महत्त्वपूर्ण निर्णय; ...तर होणार कारवाई
आरबीआय बँक
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 6:45 AM

नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात बँकेंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अलिकडच्या काळात बँक ही एक अत्यावश्यक सेवा झाली आहे. आपले पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठी किंवा पैशांची गरज भासल्यास कर्ज घेण्यासाठी व्यक्ती हा बँकांवर अवलंबून असतो. मात्र अनेक वेळा काही कारणांमुळे व्यक्तीची फसवणूक होते. बॅंकेचे दिवाळे निघाल्यास ग्राहकांना बँकेतून त्यांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. एवढेच नव्हे तर एखाद्या ग्राहकाने बँकेकडून कर्ज घेतले असल्यास जादा टक्केवारी आकारून त्याची फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आता भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या ‘आरबीआय’कडून (RBI)  कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत.

बँकांच्या व्यवसायिक मॉडेलवर आरबीआयचे लक्ष

याबाबत बोलताना रिझर्व्ह बँकेंचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काही धोरनात्माक पाऊले उचलली जात आहेत. या अंतर्गंत बँकेच्या व्यवसायिक मॉडेलवर आरबीआयचे पूर्ण लक्ष असणार आहे. आपले व्यवसायिक मॉडेल काय असावे? याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित बँकाना आहे. मात्र हे धोरण ठरवत असताना ते जास्त जोखमीचे नसावे, जेणे करून पुढे चालून बँकेमुळे ग्राहकांचे नुकसान होऊ नये. याकडे आरबीआयचे विशेष लक्ष राहणार आहे. बँकेच्या व्यवसायिक धोरणात काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याचा सल्ला संबंधित बँकेला देण्यात येईल.  जर त्या त्रुटी वेळेत दुरुस्त न झाल्यास आवशकतेनुसार दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

… म्हणून बँका डबघाईला आल्या 

पीएमसी आणि एस बँकेसारख्या काही बँकांनी अनेक कंपन्यांना कोट्यावधी रुपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप केले, ही कर्ज वेळेत वसूल न झाल्याने बँका डबघाईला आल्या. कारभारामध्ये गैरव्यवहार आढळून आल्याने आरबीआयकडून या बँकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली  आहे. कारवाई झाल्याने, ग्राहकांच्या व्यवाहारावर देखील निर्बंध आले. आता हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आरबीआयकडून कडक पाऊले उचलली जात आहेत.

जोखमीचे कर्ज न वाटण्याचे आवाहन 

पुढे बोलताना दास यांनी म्हटले आहे की, बँकेचे व्यवसायिक धोरण हे ती बँक आर्थिक दृष्या कीती मजबूत आहे यावर ठरवण्यात यावे. एखादी बँक वाढीव व्याजदराच्या आशेने मोठ्या प्रमाणात जोखमीचे कर्ज वाटप करते. परिणामी असे कर्ज वसूल होत नाही. संबंधित ग्राहकाचे खाते एनपीए होते. अशा एनपीए खात्याची संख्या वाढल्याने बँक डबघाईला येते. हेच टाळण्यासाठी आता आरबीआयकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या 

स्टार्ट अपमध्ये जगाचे नेतृत्व भारताच्या हातात; 70 पेक्षा अधिक स्टार्ट अपने ओलांडला एक अब्ज डॉलरचा टप्पा – मोदी

पीएफ खाते बंद झाले? चिंता नको, आता पाचशे रुपये भरून पुन्हा सुरू करता येणार खाते

कच्च्या तेलाचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.