Credit card : क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत विक्रमी वाढ; जाणून घ्या क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी

क्रेडिट कार्ड हा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय आहे. पूर्ण महिना वापर करुन महिन्याच्या शेवटी पैसे भरता येतात. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करताना काही काळजी देखील घ्यावी लागते, अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. नेमकी काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Credit card : क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत विक्रमी वाढ; जाणून घ्या क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 2:10 AM

पुणे : पुण्यात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या सोहमने गेल्या महिन्यात क्रेडिट कार्डने (credit card) 51,500 रुपयांचा खर्च केला. 20 जुलै ही बिल भरण्याची अंतिम तारीख होती. सोहमने 16 जुलै रोजी 46,500 रुपये एका बँक खात्यातून आणि 5000 रुपये दुसऱ्या बँक खात्यातून भरले. त्यानंतर 22 तारखेला 5000 रुपयांचे पेमेंट डीक्लाइन झाल्याचे कळले. त्यानंतर त्याने लगेचच ते पैसे (money) पुन्हा भरले. 1 ऑगस्टला त्याच्याकडे 2368 रुपयांचा टॅक्स आणि जीएसटी (GST) असलेलं बिल आले.जर तुम्ही देखील क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर सोहमचे उदाहरण नक्की लक्षात ठेवा. 5000 रुपये पेमेंट भरण्यासाठी केवळ 2 दिवस उशीर झाल्याने त्याला 2368 रुपये व्याज भरावे लागले. हे तर फक्त एक उदाहरण आहे. क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांच्या थोड्याशा चुकीचा आणि मजबुरीचा खूप फायदा घेतात. असे असतानादेखील क्रेडिट कार्डचा वापर वाढतच आहे. RBI च्या अहवालानुसार मार्च 2022 मध्ये देशात 19 लाख नवीन कार्ड सुरू करण्यात आले. ही 23 महिन्यातील उच्चांकी संख्या आहे. यासोबतच एकूण क्रेडिट कार्डची संख्या 7.36 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये 18.7 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डमधून केला गेलेला खर्च 1 लाख कोटी रुपये इतका आहे.

अर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय

क्रेडिट कार्ड हा आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी चांगला पर्याय आहे. पूर्ण महिना वापर करुन महिन्याच्या शेवटी पैसे भरता येतात. इतकेच नाही तर पैसे भरण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी मिळतो. या रकमेववर कोणतेही व्याज आकारले जात नाही. परंतु बँक ही कोणतीही समाजसेवा करत नाही. पैसे हे ग्राहकांकडूनच वसूल केले जातात हे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. केवळ ग्राहकांच्या एका चुकीकडे या कंपन्या नजर ठेऊन असतात जेणेकरून त्यातून चांगली कमाई करता येईल.जेव्हा क्रेडिट कार्डचे बिल येते तेव्हा ते भरण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये एक कमी रक्कम भरण्याचा. जर हा पर्याय निवडला तर उर्वरित बिल हे पुढील महिन्यात भरता येते. जर पूर्ण रक्कम न भरल्यास तुम्हाला इंटरेस्ट फ्री क्रेडिट कालावधीचा पर्याय मिळत नाही. यामध्ये पूर्ण रकमेवर खरेदीच्या एक दिवस आधी वार्षिक 48 ते 60 टक्के व्याज लागते. जर हे नियमित केले तर ही रक्कम वाढत जाते. क्रेडिट कार्ड कंपन्या या माध्यमातून जास्त कमाई करतात.

…तर आकारला जातो मोठा दंड

आजकाल मोठ्या संख्येने क्रेडिट कार्डचा वापर होत आहे. जर एखाद्या क्रेडिट कार्डवर एक रुपया देखील भरायचा राहिल्यास आधीच्या बिलाच्या पूर्ण रकेमवर व्याज आणि दंड भरावा लागतो. यामध्ये क्रेडिट कार्डची वार्षिक फी देखील समाविष्ट असते. जेव्हा रक्कम जास्त असते तेव्हा क्रेडिट कार्ड कंपन्या ही रक्कम भरण्यासाठी दबाव टाकत असतात. यामुळे क्रेडिट स्कोअर देखील खराब होतो. यामुळे लोनसाठी अर्ज केल्यास तो नामंजूर होतो. त्यामुळे लोनची गरज असल्याने शेवटी क्रेडिट कार्डच्या संपूर्ण बिलाची भरपाई करावी लागते.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणतात

क्रेडिट कार्ड वापरण्यामध्ये काही गैर नाही. आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. परंतु क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरणे गरजेचे आहे. मीनिमम पेमेंटपासून वाचण्याचा प्रयत्न करा. जर भरपाईची रक्कम जास्त असेल आणि एकरकमी भरु शकत नसाल तर EMI वर भरा. यामुळे कर्जाची परतफेड करणे सोपे होईल आणि व्याजदेखील कमी लागेल. असे सेबीचे फायनान्शियल प्लॅनर जितेंद्र सोळंकी सांगतात. जर एकाहून अधिक क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्यातील एका कार्डचे 10-20 रुपये भरणे बाकी असेल तर ते तात्काळ भरा. जे क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर बंद करा. असे न केल्यास वार्षिक शुल्क न भरल्यास व्याज आणि दंड लागू शकतो. तसेच क्रेडिट स्कोअर खराब होऊन नुकसानदेखील होऊ शकते.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...