‘एसबीआय’ची ग्राहकांसाठी खास ऑफर; गोल्ड लोन झाले स्वस्त, जाणून घ्या काय आहेत नवे व्याजदर?
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इडिंयाने (sbi) आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. बँकेने गोल्ड लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे.
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इडिंयाने (sbi) आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली ऑफर आणली आहे. बँकेने गोल्ड लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना एसबीआयकडून 7.50 टक्क्यांच्या वार्षिक व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध होणार आहे. तसेच ग्राहकाला आपल्या सोईनुसार 20 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत गोल्ड लोन घेता येणार आहे. याबाबत एसबीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.
प्रोसेसिंग फी विरहीत कर्ज
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमच्या ग्राहकांसाठी बँकेने एक चांगली ऑफस आणली आहे. बँक ग्राहकांना स्वस्त दरात अवघ्या 7.50 टक्क्यांच्या व्याजदराने गोल्ड लोन उपलब्ध करून देत आहे. गोल्ड लोन घेताना ग्राहकाकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारण्यात येणार नाही. तसेच कमीत कमी कागद पत्रांमध्ये ग्राहकाला गोल्ड लोन उपलब्ध करून देण्यात येईल. ग्राहक त्यांच्या इच्छेनुसार बँकेतून 20 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत कितीही गोल्ड लोन घेऊ शकतात. ग्राहकाला लोन कमीत कमी वेळेत उपलब्ध करून देण्यात येईल.
गोल्ड लोनसाठी ‘असे’ करा अप्लाय
लोनसाठी तुम्ही बँकेच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. त्यानंतर अवघ्या तीन सोप्या स्टेपमध्ये तुम्हाला लोन उपलब्ध करून दिले जाते. तुम्ही बँकेत लोनसाठी अर्ज केल्यानंतर सर्व प्रथम तुमच्याकडे किती सोने आहे, सध्याचे सोन्याचे दर काय आहेत हे पाहीले जाते. त्यावरून तुम्हाला किती गोल्ड लोन भेटणार हे ठरते. ते ठरल्यानंतर तुम्ही जे लोन घेणार आहात, त्याच्यासाठी बँकेकडून काही खास ऑफर सुरू आहेत का? त्या ऑफरचा लाभ तुम्हाला मिळू शकतो का? हे चेक केले जाते. त्यानंतर तुमच्याकडून कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर लोन तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.
Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!https://t.co/kdybomXESW#Holidaystobanks|#bank|#holidays|#financialtransactions
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 16, 2021
संबंधित बातम्या