Rekha Jhunjhunwala : पोर्टफोलिओत आला नवीन सदस्य, या कंपनीच्या शेअरची वाढली संख्या, तुम्हाला काय होईल फायदा

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांनी गुरुकडून मंत्र घेऊन त्यांच्यानंतर मोठी प्रगती केली आहे. श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत त्या अग्रेसर आहे. त्यांनी पोर्टफोलिओत आता हा बदल केला आहे.

Rekha Jhunjhunwala : पोर्टफोलिओत आला नवीन सदस्य, या कंपनीच्या शेअरची वाढली संख्या, तुम्हाला काय होईल फायदा
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. त्यांनी कोणते नवीन शेअर घेतले. जुन्या शेअरमध्ये पुन्हा किती गुंतवणूक वाढवली. कोणत्या कंपनीचे शेअर विक्री केले. यासंबंधीच्या अपडेट घेण्याचा प्रयत्न गुंतवणूकदार (Investors) करतात. आता अनेक कंपन्यांचे मार्च 2023 तिमाहीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणी किती गुंतवणूक केली, याचा खुलासा होत आहे. त्यानुसार, रेखा झुनझुनावाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओत (Portfolio) एक नवीन शेअर जोडला आहे. जानेवारी-मार्च 2023 या काळात या नवीन कंपनीचा शेअर त्यांनी खरेदी केला आहे. तर या कंपनीचे आणखी शेअर त्यांनी खरेदी केले आहे.

कोणती आहे कंपनी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओत नवीन शेअर दाखल झाला आहे. मार्च 2023 तिमाहीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न नुसार, Raghav Productivity Enhancers त्यांनी पहिल्यांदा गुंतवणूक केली आहे. तर टाटा समूहाच्या टायटन (Titan) या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ केली आहे. गुंतवणूकदारांना जर अधिकचा फायदा मिळवायचा असेल तर त्यांना हे पॅटर्न फॉलो करता येईल. पण त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Raghav Productivity Enhancers रेखा झुनझुनावाला यांनी पहिल्यांदा या कंपनीत गुंतवणूक केली. त्यांच्या पोर्टफोलिओत हा शेअर दाखल झाला. त्यांच्याकडे या कंपनीचे 6 लाख इक्विटी शेअर आहे. त्यांचे बाजारातील मूल्य 51.9 कोटी रुपये आहे. बीएसईवर सध्या मार्च 2023 तिमाही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार त्यांची या कंपनीतील वाटा 5.23 टक्के आहे. ही कंपनी फेरो एलॉयज, रॅमिंस मास, सिलिकी रॅमिंग मिक्सेज आणि पिग आयरन हे उत्पादन निर्मिती करते आणि त्यांची निर्यात करते.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत बीएसईवर Raghav Productivity Enhancers च्या शेअरची किंमत सध्या 864.75 रुपये आहे. या वर्षी हा शेअर 3.55 टक्क्यांनी कमकूवत झाला आहे. या कंपनीचा शेअर गेल्यावर्षी 434 रुपयांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी 16 जानेवारी 2023 रोजी हा शेअर 1180 रुपयांच्या रेकॉर्ड उच्चांकावर होता.

टायटन शेअरची खरेदी टाटा समूहाचा हा शेअर रेखा झुनझुनवाला यांचे पती राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओत अव्वल होता. या शेअरमुळेच आपले नशीब चमकल्याचे राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले होते. रेखा झुनझुनवाला यांना पण या शेअरवर अधिक विश्वास आहे. त्यांनी मार्च 2023 तिमाहीत या शेअरमधील त्यांची गुंतवणूक वाढवली.

इतके वाढले शेअर मार्च 2023 तिमाहीमधील आकेडवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4,69,45,970 इक्विटी शेअर असून कंपनीत त्यांचा वाटा 5.29 टक्के इतका आहे. या शेअरचे मूल्य जवळपास 12,138.6 कोटी रुपये आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांची या कंपनीत 5.2 टक्के हिस्सेदारी होती. सध्या या शेअरची किंमत 2583.90 रुपये आहे. गेल्यावर्षी पेक्षा हा शेअर केवळ 0.71 टक्के वाढला आहे.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.