Reliance AGM 2024: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती अन् रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या सर्वसाधरण सभेत जिओ एआय क्लाउड ( Jio AI Cloud) लॉन्च करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये युजर्स आपले फोटो, व्हिडिओ, डॉक्यूमेंट अपलोड करु शकणार आहे. जिओ एआय क्लाउडची वेलकम ऑफर दिवाळीपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये जिओ युजरला 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. त्याच्या मदतीने प्रत्येक भारतीयाला प्रत्येक उपकरणावर AI सेवा आणि क्लाउड स्टोरेजची सुविधा मिळू शकेल. कंपनीच्या मते, हा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे.
रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, प्रत्येक भारतीयापर्यंत एआय पोहोचवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. कोणत्याही उत्पन्न गटाचा व्यक्ती असला तरी त्याच्याकडे एआय असणार आहे. त्याच्यापर्यंत एआय आणि त्याची वैशिष्ट्ये असणार आहेत. त्यामुळे, प्रत्येकजण त्याच्या कंपनीच्या कनेक्टेड इंटेलिजन्सचा वापर करू शकेल. त्यामध्ये एआय आणि क्लाउड स्टोरेज इत्यादींचा समावेश आहे.
Jio AI-Cloud वेलकम ऑफर आता जाहीर केली आहे. मात्र, यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ही ऑफर दिवाळीनंतर सुरू होणार आहे. सुरुवातीला कंपनी युजरला 100GB क्लाउड स्टोरेज मोफत देईल. मात्र, किंमती नंतर जाहीर केल्या जाऊ शकतात, असे मानले जात आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी एआय डॉक्टर आणि एआय टीचर ही सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. या सेवेचा अनेक लोकांना फायदा होणार आहे. ज्या भागात डॉक्टर, शिक्षक सहज पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी या सेवेचा फायदा होणार आहे.
रिलायन्स कंपनी ने Jio TV OS देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ओएस कंपनी सेट-टॉप बॉक्समध्ये देणार आहे.
तसेच Jio App Store कंपनी सुरु करणार आहे. मुकेश अंबानी यांनी Jio Call AI सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात जिओ कॉल रिकॉर्ड करण्याची सुविधा लगेच मिळणार आहे. या कॉलमध्ये ट्रान्सक्राइबचे ऑप्शन मिळणार आहे. कंपनीने Disney+ Hotstar सोबत भागेदारीचा निर्णय जाहीर केला आहे.