Reliance बनली देशातील सर्वोत्तम कंपनी, फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021च्या यादीत कोणत्या स्थानी?
देशातील एकूण 19 कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले. पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये ICICI बँक 65 व्या स्थानावर, HDFC बँक 77 व्या स्थानावर आणि HCL टेक 90 व्या स्थानावर आहे.
नवी दिल्ली : फोर्ब्सने 2021 साठी जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांची वार्षिक यादी जाहीर केली. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) फोर्ब्स वर्ल्ड बेस्ट एम्प्लॉयर 2021 च्या यादीत भारतीय कंपन्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रिलायन्स जगभरात 52 व्या क्रमांकावर आहे. या यादीत 750 बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आलाय. देशातील एकूण 19 कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले. पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये ICICI बँक 65 व्या स्थानावर, HDFC बँक 77 व्या स्थानावर आणि HCL टेक 90 व्या स्थानावर आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन कापले नाही
कोरोना संकटाच्या कठीण काळात हे यश मिळवणे रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी खूप महत्त्वाचे आहे. कोविड साथीच्या काळात सर्वत्र व्यवसाय ठप्प होते आणि नोकऱ्या हिरावल्या जात होत्या. अशा वाईट काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन कापले जाणार नसल्याचं आश्वासन दिलं. कंपनीचे प्रत्येक कर्मचारी नोकरी गमावल्याची चिंता न करता त्यांचे काम करू शकतात, याची खात्री केली. त्याच वेळी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय गरजा आणि लसीकरणाची देखील काळजी घेण्यात आली. रिलायन्सने हे सुनिश्चित केले आहे की, कोरोनामुळे मागे राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या आश्रितांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहे.
हे आहेत जगातील 10 सर्वोत्तम नियोक्ते?
दक्षिण कोरियाच्या सॅमसंगने जगातील सर्वोत्तम नियोक्ताचा खिताब पटकावला आहे. दुसऱ्या ते सातव्या स्थानावर अमेरिकन कंपन्यांनी कब्जा केला. यामध्ये IBM, Microsoft, Amazon, Apple, Alphabet आणि Dell Technology यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर 8 व्या क्रमांकावर हुआवेई आहे, जी पहिल्या 10 मध्ये समाविष्ट असलेली एकमेव चिनी कंपनी आहे. त्याच वेळी 9 व्या क्रमांकावर अॅडोब ऑफ अमेरिका आणि 10 व्या क्रमांकावर जर्मनीचा बीएमडब्ल्यू ग्रुप आहे.
Statista च्या सहकार्याने तयार केलेली यादी
फोर्ब्सने मार्केट रिसर्च कंपनी स्टॅटिस्टाच्या सहकार्याने जगातील सर्वोत्तम नियोक्त्यांची वार्षिक यादी तयार केली. रँकिंग निश्चित करण्यासाठी स्टॅटिस्टाने बहुराष्ट्रीय कंपन्या आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या 58 देशांतील 150,000 कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. यादीत समाविष्ट होण्यासाठी कंपन्यांना अनेक मापदंडांमधून जावे लागते. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनुभवांची गुणवत्ता, त्यांचे कंपनीचे मूल्यमापन आणि त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांविषयी त्यांचे मत जाणून घेतले जाते. ज्या कंपन्या यात भेटतात, त्यांनाच ही पदवी मिळते.
रिलायन्सला अनेक उपाध्या मिळाल्या
कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्सची धोरणे आणि कंपनीच्या कार्यसंस्कृतीला भूतकाळातही अनेक मान्यता मिळाल्यात. अलीकडेच कंपनीला ‘ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिट्यूट’ चा दर्जा मिळाला. कंपनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यावसायिक कामात सर्वोत्तम होण्यासाठी सतत मदत करते. या उत्कृष्ट कार्यासाठी ती लिंक्डइनच्या शीर्ष कंपन्यांच्या यादीचा एक भाग आहे. कंपनी आणि त्याच्या विविध व्यवसायांनी वर्ष 2020-21 मध्ये अनेक HR उत्कृष्टता पुरस्कार देखील जिंकलेत.
संबंधित बातम्या
‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक करून दरमहा तुमच्या खात्यात पैसे येणार, व्याजदर काय?
सोन्याचे भाव वाढले, चांदीसुद्धा महागली; पटापट तपासा ताजे दर
Reliance became the best company in the country, which place in the list of Forbes World’s Best Employer 2021?