AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलायन्स कॅपिटलच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत प्रशासन आणि कर्जदार यांच्यात मतभेद ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

कर्जात बुडालेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत रिझर्व्ह बँकेने (RBI) नियुक्त केलेला प्रशासक आणि कर्जदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनूसार, आरसीएल आणि त्याच्या उपकंपनी युनिट्सच्या कर्ज निराकरणासाठी 25 मार्चपर्यंत 54 निविदा प्राप्त झाल्या आहेत.

रिलायन्स कॅपिटलच्या ‘कर्ज निराकरण’ प्रक्रियेबाबत प्रशासन आणि कर्जदार यांच्यात मतभेद ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 8:09 PM

रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या (RCL) च्या कर्ज निराकरण प्रक्रियेवरून RBI-नियुक्त प्रशासक (Appointed Administrator )आणि कर्जदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. RCL साठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) पाठवण्याचा हा शेवटचा दिवस होता. यापैकी 22 EOI RCL साठी एकल कंपनी म्हणून आले आहेत. तर उर्वरित बोली त्याच्या प्रत्येक आठ उपकंपन्यांसाठी करण्यात आल्या आहेत. आरसीएलच्या वतीने सर्व बोलीदारांना दोन पर्याय देण्यात आले होते. भारतातील पहिल्या पर्यायामध्ये, आरसीएल आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांना बोली लावता येऊ शकते, तर दुसऱ्या पर्यायामध्ये, उपकंपन्यांसाठी स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे बोली लावण्याची सुविधा (Bidding facility) देण्यात आली होती.

नेमका वाद काय?

RCL च्या उपकंपनी संस्थांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन आणि रिलायन्स सिक्युरिटीज यांचा समावेश आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले प्रशासक आणि कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये थकीत कर्जाच्या वसुलीसाठी दिवाळखोरी प्रक्रिया राबविण्यावरून मतभिन्नता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, RCL च्या उपकंपनी युनिट्स आणि त्यांच्या कर्ज निराकरण प्रक्रियेबाबत बँकांचे कायदेशीर सल्लागार आणि प्रशासक यांच्यात एकमत झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फरकाचे कारण म्हणजे आरसीएलच्या सर्व उपकंपनी नफा कमावत आहेत आणि त्यांच्याकडे कोणतीही भांडवली मालमत्ता नाही. अशा परिस्थितीत दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत या उपकंपन्यांसाठी कोणताही संकल्प योजना सादर केली जाऊ शकत नाही.

एकमताचा अभाव

खरं तर, यापैकी कोणत्याही उपकंपनीला कोणत्याही दबावाचा सामना करावा लागत नाही आणि त्यांचा व्यवसायही सुरळीत सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, आरसीएलच्या उपकंपनीच्या विक्रीसाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा यावर एकमत नसल्यामुळे संकल्प आराखड्याला अंतिम रूप देण्यास विलंब होत आहे. वेळापत्रकानुसार 5 एप्रिलपर्यंत सर्व बोली लावणाऱ्या कंपन्यांना रिझोल्यूशन प्लॅनचे दस्तऐवज सादर करायचे होते. मात्र अद्यापपर्यंत त्याच्या अटी निश्चित झालेल्या नाहीत.

संबंधित बातम्या

Startups कंपन्यांना अच्छे दिन; चालू वर्षाच्या पहिल्या तीमाहीत उभारले 10.8 अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल

बीएमडब्ल्यूचं मिशन इंडिया : नवं आर्थिक वर्ष मोक्याचं, 24 नव्या गाड्याचं लाँचिंग

वजन कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस ! ‘बीएमआय’ करावा लागेल कमी

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.