AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : या शेअरवर पडल्या ग्राहकांच्या उड्या, मुकेश अंबानी यांचा प्लॅन तर हाच

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांच्यामुळे शेअर बाजारात हा स्टॉक सध्या धुमाकूळ घालत आहे. सध्या या कंपनीबाबत अनेक वृत्त बाजारात येत आहे. त्याचा फायदा या शेअरला होत आहे. हा शेअर इंट्राडेमध्ये 12.5 टक्क्यांनी वाढून 20.11 रुपये प्रति शेअरवर पोहचला आहे. हा शेअर 52 आठवड्यातील 21.7 रुपयांच्या उच्चांकावर आहे.

Mukesh Ambani : या शेअरवर पडल्या ग्राहकांच्या उड्या, मुकेश अंबानी यांचा प्लॅन तर हाच
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : या कंपनीविषयीच्या घडामोडींना वेग आला आहे. अनेक अपडेट समोर येत असल्याने या कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या नजरा खिळल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या काही योजनांचा अंदाज बाजारातील तज्ज्ञांना आला आहे. त्यामाध्यमातून या कंपनीचा शेअर वधारला आहे. कंपनीचा शेअर बाजारात (Share Market) सध्या धुमाकूळ घालत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये याअगोदरच गुंतवणूक केली आहे. तर काही जणांना हा स्टॉक खूणावत आहे. वृत्त पक्क झालं तर हा शेअर गगन भरारी घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील तज्ज्ञांसह गुंतवणूकदारांचे या कंपनीच्या अपडेटकडे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत ही कंपनी भरभराटीला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेअरमध्ये तेजी आली आहे.

Alok Industries Share

आलोक इंडस्ट्रीज शेअर हा काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी पण अशाच चर्चा रंगल्या होत्या. या शेअरने गुरुवारी इंट्राडेमध्ये 12.5 टक्क्यांची वाढ नोंदवली. हा शेअर 20.11 रुपये प्रति शेअरवर पोहचला. हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकी 21.7 रुपयांच्या जवळपास आहे. दुपारी 12.05 वाजता टेक्सटाईल कंपनीच्या शेअरमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली. त्यावेळी तो 19.83 रुपये प्रति शेअरवर होता.

हे सुद्धा वाचा

मोठ्या प्रमाणात व्यवहार

तर बेंचमार्क S&P बीएसई निर्देशांकावर तो 0.11 टक्के घसरला. आतापर्यंत अनेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून 116.46 दशलक्ष शेअरचा व्यवहार झाला आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकावर या शेअरमध्ये सध्या तुफान आले आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत.

मुकेश अंबानी यांच्या या निर्णयाची चर्चा

गेल्या एक महिन्यापासून बेंचमार्क निर्देशांकांमध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली. पण त्या तुलनेत या स्टॉकमध्ये 22 टक्क्यांची वाढ झाली. यादरम्यान 14 ऑगस्ट रोजी अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने एक निर्णय घेतला. त्यात चालु आर्थिक वर्षांत सहायक कंपन्यांमध्ये जवळपास 14,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील 7,000 कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा आलोक इंडस्ट्रीजसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

कंपनीचा पोर्टफोलिओ

आलोक इंडस्ट्रीजमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि जेएम एआरसी यांची भागीदारी आहे. रिलायन्सकडे 40.01 टक्के हिस्सेदारी आहे. तर दुसऱ्या भागीदाराकडे 34.99 टक्के वाटा आहे. ही कंपनी इंटिग्रेटेड कापड निर्मितीतील भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी कापड आणि पॉलिस्टर क्षेत्रात अग्रेसर आहे. आता या गुंतवणुकीमुळे कंपनीला मोठी भरारी घेता येईल.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....