मुकेश अंबानींची रिलायन्स आता रेस्टॉरंट क्षेत्रात उतरणार, स्टारबक्स आणि डॉमिनोजसमोर आव्हान

Reliance | हा व्यवहार यशस्वीपणे पूर्णत्वाला गेला तर भारतात टाटा समूहाच्या स्टारबक्स आणि ज्युबलिएंट समूहाला रिलायन्सशी स्पर्धा करावी लागेल. सध्याच्या घडीला भारतात ज्युबलिएंट ग्रुपचे डॉमिनोज पिज्जा, बर्गर किंग हे ब्रँड लोकप्रिय आहेत.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता रेस्टॉरंट क्षेत्रात उतरणार, स्टारबक्स आणि डॉमिनोजसमोर आव्हान
मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 7:43 AM

मुंबई: पेट्रोकेमिकल, रसायन, दूरसंचार, डिजिटल, अन्नधान्य, फर्निचर आणि रिटेल क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता रिलायन्स समूह आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. मुकेश अंबानी लवकरच भारतातील रेस्टॉरंट क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) आणि सबवे इंक यांच्या बोलणी सुरु आहेत. सबवे इंक ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट चेन आहे. या कंपनीची भारतीय फ्रेंचायजी खरेदी करण्यासाठी मुकेश अंबानी प्रयत्नशील असल्याचे समजते. हा व्यवहार 1488 कोटी ते 1860 कोटी रुपयांमध्ये पार पडू शकतो, अशीही माहिती आहे.

हा व्यवहार यशस्वीपणे पूर्णत्वाला गेला तर भारतात टाटा समूहाच्या स्टारबक्स आणि ज्युबलिएंट समूहाला रिलायन्सशी स्पर्धा करावी लागेल. सध्याच्या घडीला भारतात ज्युबलिएंट ग्रुपचे डॉमिनोज पिज्जा, बर्गर किंग हे ब्रँड लोकप्रिय आहेत.

सबवे इंक ही अमेरिकास्थित सर्वात मोठी सिंगल ब्रँड रेस्टॉरंट चेन कंपनी आहे. ही कंपनी भारतामध्ये फ्रेंचायजी तत्त्वावर काम करते. रिलायन्स आणि सबवे इंकमधील बोलणी यशस्वी ठरल्यास देशभरातील सबवेची 600 आऊटलेटस रिलायन्सच्या ताब्यात येतील. त्यामुळे रिलायन्स रिटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रात वेगाने वाटचाल करेल. सबवेने 2001 साली भारतामध्ये प्रवेश केला होता.

रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून विस्ताराची योजना

सिंगल ब्रँड रेस्टॉरंट व्यवसायात रिलायन्स समूह आपल्या रिटेल कारभाराच्या सहाय्याने विस्तार करण्याची योजना आखत आहे. सध्याच्या घडीला रिलायन्सने रिटेल, धान्यविक्री, गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि लाईफस्टाईल या क्षेत्रांमध्ये चांगलाच जम बसवला आहे. त्यानंतर आता रिलायन्स रेस्टॉरंट क्षेत्रात पदार्पण करण्याची योजना आखत आहे.

सध्या भारतात सबवेची फ्रेंचायजी कोणाकडे?

सध्या सबवे इंकच्या भारतातील फ्रेंचायजी डाबरच्या अमित बर्मन यांच्या मालकीच्या लाइट बाईट फुडसकडे आहे. मात्र, याची मालकी डॉक्टर्स असोसिएसटकडे आहे. त्यांना प्रत्येक फ्रेंजायजीसाठी 8 टक्क्यांचा महसूल मिळतो. भारतामध्ये या क्षेत्रातील उलाढाल जवळपास 18 हजार कोटींच्या आसपास आहे. 21 टक्के हिस्स्यासह डॉमिनोज या क्षेत्रात आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मॅकडोनाल्डस असून त्यांचा हिस्सा जवळपास 11 टक्के इतका आहे.

संबंधित बातम्या:

दोन रुपयांचं नाणं मिळवून देणार पाच लाख रुपये, तुमच्याकडे जुनी नाणी आहेत का?

कोणत्या झाडाचं लाकूड सर्वाधिक टिकावू आणि मजबूत? ‘हे’ आहे या प्रश्नाचं उत्तर

भारतात इथं फिरणारे रात्रीतून अब्जाधीश बनू शकतात! वाचा ‘या’ 5 ठिकाणांविषयी…

(Mukesh Ambani Reliance industries may take franchise subway restaurant chain)

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.