रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेतील आपली शेल गॅस मालमत्ता विकणार, करारावर स्वाक्षरी

मिडस्ट्रीम म्हणजे हायड्रोकार्बन्सची प्रक्रिया, स्टोरेज, वाहतूक आणि विपणन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, कंपनीच्या उपकंपनी रिलायन्स ईगलफोर्ड अपस्ट्रीम होल्डिंग LP (REUHLP) ने ईगलफोर्ड शेलच्या मालमत्तेतील भागभांडवल निर्गुंतवणुकीसाठी Ensign Operating 3 LLC सोबत 5 नोव्हेंबर 2021 रोजी करार केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेतील आपली शेल गॅस मालमत्ता विकणार, करारावर स्वाक्षरी
mukesh amabni
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 10:27 PM

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने ईगलफोर्डच्या (Eagleford) शेल गॅस मालमत्तेतील हिस्सा विकण्याचे मान्य केलेय. यासह कंपनी अमेरिकेतील शेल गॅस व्यवसायातून बाहेर पडलीय. कंपनीने अद्याप या कराराचे मूल्य सार्वजनिक केलेले नाही. रिलायन्सने 2010 ते 2013 दरम्यान शेवरॉन, पायोनियर नॅचरल रिसोर्सेस आणि कॅरिझो ऑईल अँड गॅससह तीन अपस्ट्रीम एक्सप्लोरेशन संयुक्त उपक्रमांमध्ये भागभांडवल विकत घेतले.

RIL अमेरिकेच्या शेल गॅस व्यवसायातून बाहेर पडली

मिडस्ट्रीम म्हणजे हायड्रोकार्बन्सची प्रक्रिया, स्टोरेज, वाहतूक आणि विपणन आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सांगितले की, कंपनीच्या उपकंपनी रिलायन्स ईगलफोर्ड अपस्ट्रीम होल्डिंग LP (REUHLP) ने ईगलफोर्ड शेलच्या मालमत्तेतील भागभांडवल निर्गुंतवणुकीसाठी Ensign Operating 3 LLC सोबत 5 नोव्हेंबर 2021 रोजी करार केला. या व्यवहारासह रिलायन्सने उत्तर अमेरिकेतील आपली सर्व शेल गॅस मालमत्ता विकली. यूएस शेल गॅस व्यवसायातून RIL पूर्णपणे बाहेर पडली.

RIL ने कोणत्या किमतीवर मालमत्तांचा व्यवहार केला?

असे सांगितले जात आहे की, रिलायन्स उत्तर अमेरिकेतील आपली शेल गॅस मालमत्ता सध्याच्या किमतीपेक्षा जास्त किमतीला विकत आहे. या व्यवहारात सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स कायदेशीर सल्लागार म्हणून रिलायन्सचे आर्थिक सल्लागार आणि गिब्सन, डन आणि क्रचर एलएलपीची भूमिका बजावत आहेत.

मुकेश अंबानी भारताबाहेर कुठेही स्थलांतर करणार नाहीत

दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय आता त्यांचा मुक्काम लवकरच लंडनमध्ये हलवणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं रिलायन्सनं स्पष्ट केलं होतं. रिलायन्स समूहानं एक निवेदन जारी करत या सर्व प्रकरणावर खुलासा केला होता. तसेच एक वृत्तपत्रानं चुकीच्या पद्धतीची बातमी दिल्याचाही रिलायन्सनं आपल्या निवेदनात उल्लेख केला होता.

स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे, त्यात 49 बेडरुम्स

विशेष म्हणजे ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकानं यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्यात स्टोक पार्क हा एखाद्या राजप्रासादाप्रमाणे असून, त्यामध्ये 49 बेडरुम्स असल्याचं सांगितलं होतं. सध्या याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह याठिकाणी राहायला जातील, असेही बातमीत म्हटले होते. स्टोक पार्क हे अंबानी कुटुंबीयांचे सेकंड होम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळातही अंबानी कुटुंबीय रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या जामनगर येथे जाऊन राहिले होते.

संबंधित बातम्या

Gold Silver Price Today : सोन्याच्या भावात घसरण, चांदी महागली, पटापट तपासा नवे दर

Paytm IPO: Paytm च्या IPO मध्ये पैसे कोण आणि कसे गुंतवू शकतो? जाणून घ्या

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.