RBI Repo Rate : पूर्णविराम नाहीच, हा तर स्वल्पविराम! आरबीआय गव्हर्नरने जोर का धक्का, हळूच दिला की राव

RBI Repo Rate : आरबीआयने यावेळी रेपो दरात कुठलीही वाढ केली नाही. महागाई निर्देशांक धोरणाविरोधात असतानाही रेपो दरात वाढीचा निर्णय तज्ज्ञांच्या पचनी तर नक्कीच पडला नाही. हेच बोलता बोलता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याही तोंडून निघाले...तुमचा आनंद आता किती दिवस टिकेल?

RBI Repo Rate : पूर्णविराम नाहीच, हा तर स्वल्पविराम! आरबीआय गव्हर्नरने जोर का धक्का, हळूच दिला की राव
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 5:27 PM

नवी दिल्ली : “हा फुलस्टॉप नाही, हा तर केवळ कॉमा आहे.” असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरासंदर्भात केला आहे. आरबीआयने यावेळी रेपो दरात (Repo Rate) कुठलीही वाढ केली नाही. महागाई निर्देशांक धोरणाविरोधात असतानाही रेपो दरात वाढीचा निर्णय तज्ज्ञांच्या पचनी तर नक्कीच पडला नाही. कारण महागाई निर्देशांकाचे कारण पुढे करत आरबीआयने सहा वेळा रेपो दरात वाढ केली. हेच बोलता बोलता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor ShaktiKant Das) यांच्याही तोंडून निघाले…तुमचा आनंद आता किती दिवस टिकेल?

निर्णयाचा परिणाम आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवल्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर पडेल. ज्यांनी वाहन कर्ज, गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेतले आहे. त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा ईएमआय जैसे थेच राहणार आहे. रेपो दरात कुठलाही बद न झाल्याने कर्ज ही महागणार नाही. परंतु, हा आनंद चिरकाल टिकणार नाही. भविष्यात कर्जाचा हप्ता वाढणारच नाही, असे नाही. रेपो दरात वाढ होऊ शकते, असे संकेत आरबीआयने दिले आहे.

कर्जदारांना किती दिवस दिलासा आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी जागतिक आणि भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती विषद केली. त्यांनी चिंता व्यक्त करत या परिस्थितीशी दोन हात करण्याचे आव्हान केले. बोलता बोलता गव्हर्नर यांनी हा रेपो दर एप्रिलच्या तिमाहीसाठी लागू असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांना पुन्हा चिंताने घेरले. कारण हा दिलासा फार काळासाठी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

जूनमध्ये होऊ शकतो बदल आरबीआयच्या रेपो दर धोरणात आता बदल झाला नसला तरी तो भविष्यात होऊ शकतो. जून महिन्यात पुन्हा आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होईल. त्यावेळी महागाईचा तोरा अधिक असेल तर आरबीआय रेपो दरात वाढ करु शकते. त्यामुळे हा दिलासा सध्या तीन महिन्यांसाठीच आहे, हे लक्षात घ्या.

भविष्यात स्थिती अवघड सध्या जागतिक बाजारात भूराजकीय घडामोडी सुरु आहे. रशिया आणि ओपेक देश अमेरिकेसह युरोपवर कुरघोडी करण्याच्या तयारीत आहे. कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने जगात आता पुन्हा महागाई भडकणार आहेत. सोने-चांदीच्या किंमती त्यामुळे कडाडल्या आहेत. इतर वस्तूंचे भाव पण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय सेवा क्षेत्राची चांगली घौडदौड सुरु आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था चांगली आहे. पण येत्या काही दिवसांतील घडामोडींवर आरबीआय निर्णय घेऊ शकते.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.