पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू महिला कोण? वार्षिक कमाई ऐकल्यावर बसेल धक्का

| Updated on: Mar 16, 2025 | 4:00 PM

Richest Hindu woman in Pakistan: सांगीताप्रमाणे रिता ईश्वर कराचीत राहणारी आहे. तिचा जन्म 16 मार्च 1981 रोजी झाला. रिता राजकारणात सक्रीय आहे. त्या पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला राजकारणी आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 30 कोटी रुपये आहे.

पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत हिंदू महिला कोण? वार्षिक कमाई ऐकल्यावर बसेल धक्का
Richest Hindu Women
Image Credit source: TV 9 Marathi
Follow us on

Richest Hindu woman in Pakistan: देशात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदल, रोशनी नादर यांची नावे आहे. परंतु पाकिस्तानात सर्वात श्रीमंत हिंदू महिला कोण आहे? याबाबत माहिती अनेकांना नाही. पाकिस्तानात 52 लाख हिंदू आहेत. ही पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या तुलनेत 2.17 टक्के आहे. पाकिस्तानातील अनेक हिंदू कुटुंब आर्थिक अडचणीत आहेत. परंतु पाकिस्तानात संगीता म्हणजे परवीन रिझवी या सर्वात श्रीमंत हिंदू महिला आहेत. त्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या अन् अभिनेत्री आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 39 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

पाकिस्तानमधील चित्रपट उद्योगात

14 जून 1958 मध्ये कराचीत परवीन रिजवी यांचा जन्म झाला. त्या पाकिस्तानी चित्रपटातील अभिनेत्री आहेत. त्यांचे खरे नाव संगीता आहे. त्यांनी 1969 मध्ये पाकिस्तानी चित्रपट ‘कोह-ए-नूर’ मध्ये एक बाल कलाकार म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर 1971 मध्ये संगीता लाहोरमध्ये गेली. त्या ठिकाणी रियाज शाहिद यांच्या ‘ये अमन’ चित्रपटातून लॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी अनेक चित्रपटात काम केल्यानंतर निर्मिती क्षेत्रात काम केले. 1976 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट सोसायटी गर्ल बनवलो. तो प्रचंड गाजला. संगीता यांची आई मेहताब रिजवी उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची बहीण नसरीन रिजवी या कविता नावाने ओळखल्या जातात. त्यासुद्धा पाकिस्तानी चित्रपट उद्योगात आहेत.

45 वर्षांच्या करियरमध्ये संगीताने अभिनेत्री आणि निर्माता-निर्देशक म्हणून 120 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपट उद्योगात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तान सरकारने त्यांना प्राइड ऑफ परफॉर्मेंस अवॉर्ड दिला. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटात ‘निकाह’, ‘मुट्ठी भर चावल’, ‘ये अमन’ आणि ‘नाम मेरा बदनाम’ यासारखे चित्रपट आहेत.

हे सुद्धा वाचा

या श्रीमंत महिला राजकारणी

सांगीताप्रमाणे रिता ईश्वर कराचीत राहणारी आहे. तिचा जन्म 16 मार्च 1981 रोजी झाला. रिता राजकारणात सक्रीय आहे. त्या पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला राजकारणी आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न 30 कोटी रुपये आहे. पाकिस्तानमध्ये हिंदूंना पूर्ण अधिकार मिळत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले हिंदू आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर नाव कमवत आहे.