AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RIL Q1 Result : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलांचा आला निकाल, कोण झाले पास, कोण नापास?

RIL Q1 Result : उद्योगपती कुटुंबात मुलांची कामगिरी त्यांना देण्यात आलेल्या उद्योगांच्या यशावर अवलंबून असते. जर उद्योगाची घौडदौड चांगली असेल तर सहाजिकच त्याचा मालक उत्तीर्ण होतो, नाही तर तो नापास होतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलांची अशी आहे कामगिरी..

RIL Q1 Result : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलांचा आला निकाल, कोण झाले पास, कोण नापास?
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 6:17 PM

नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) देशातीलच नाही तर आशियातील बडे उद्योगपती आहेत. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) जून तिमाहीचे निकाल नुकतेच घोषीत झाले. धीरुभाईंनी लावलेले हे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. मुकेश अंबानी यांची नवीन पिढी पण व्यवसायात उतरली आहे. रिलायन्सची जागतिक घौडदौड आहे. जगातील टॉप कंपन्यांमध्ये रिलायन्सचे नाव आहे. रिलायन्सचा पसारा सातत्याने वाढत आहे. अनेक जुने ब्रँड, नवीन ब्रँड रिलायन्सच्या पंखाखाली येत आहे. मुकेश अंबानी यांनी मुलांच्या हातात काही कंपन्यांचा कारभार सोपावला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांची तीनही मुलं या जबाबदाऱ्या संभाळत आहे. त्यांची मुलगी ईशाचे नाव सातत्याने चर्चेत आहे. तर या निकालात अंबानी कुटुंबातील कोणी कशी जबाबदारी पेलली, कोण उत्तीर्ण झाले हे या निकालातून समोरं आलं आहे.

तिघांकडे सोपावली जबाबदारी

मुकेश अंबानी यांनी त्यांचा महत्वकांक्षी प्रकल्प रिलायन्स जिओची (Reliance Jio) जबाबदारी मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) याच्या खांद्यावर दिली होती. तर रिटेल बिझनेस मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) सांभाळत आहे. लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याच्याकडे ऑईल रिफाईनिंग आणि पेट्रोकेमिकल्स बिजनेसचा (Reliance Petrochemical Business) कारभार आहे.

हे सुद्धा वाचा

जिओची कामगिरी

जिओ प्लॅटफॉर्म्सवर एप्रिल-जून तिमाहीत ग्राहक वाढले आहेत. तसेच शुद्ध नफ्यात वाढ झाली आहे. वार्षिक शुद्ध नफा 12.5 टक्क्यांनी वाढून तो 5,098 कोटी रुपये झाला. गेल्या तिमाहीत जिओचा शुद्ध नफा 4,530 कोटी रुपये होता.

कामगिरी सुस्तावली

सहा तिमाहीत रिलायन्स जिओचा नफा आणि महसुलात घसरण झाली. ही सर्वात कमी वाढ आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये जिओ इन्फोकॉम, काही स्टार्टअप, संगित आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग एपचा समावेश आहे.

तिमाहीतील कामगिरी

शुक्रवारी रिलायन्स जिओच्या तिमाही निकालांची माहिती देण्यात आली. एप्रिल-जूनच्या काळात महसूल 11.3 टक्के वाढला. महसूल 26,115 कोटी रुपये झाला. तर गेल्यावर्षी याच कालावधीत महसूल 23,467 कोटी रुपये होता.

रिलायन्सन रिटेलची भरारी

ईशा अंबानीकडे रिलायन्स रिटेलची जबबादारी आहे. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या शुद्ध नफ्यात 19 टक्के वाढ झाली. हा नफा 2,448 कोटींवर पोहचला होता. किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन अशा श्रेणीमध्ये बाजारात उसळी घेण्यात कंपनीला यश आले आहे. गेल्या वर्षात नफ्याचा आकडा हा 2,061 कोटी रुपयांवर पोहचला होता.

555 नवीन स्टोअर

कंपनीच्या तिमाही ऑपरेटिंग उत्पन्नात वाढ दिसून आली. त्यात 19.5 टक्क्यांची वाढ होऊन तो 62,159 रुपयांवर पोहचला. एका वर्षापू्वी याच कालावधीत हा आकडा 58,554 कोटी रुपये होता. रिलायन्स रिटेलनुसार या तिमाहीत 555 नवीन स्टोअर उघडण्यात आली.

रिफाईनिंगची कामगिरी काय

आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत कच्चा तेलाच्या किंमतीत 31% घसरण झाली. त्यामुळे महसूल घटला. रिलायन्सचा ऑईल रिफाईनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाच्या महसूलात 2,31,132 कोटींची घसरण झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही घसरण 4.7% इतकी आहे. रिलायन्सच्या O2C सेगमेंटमधील तिमाहीत महसूल 7.7% घसरण होऊन तो 133,031 कोटींवर घसरला.