Rocket Share : गगनयान मोहिमेपूर्वीच रॉकेट झाला या कंपनीचा शेअर, महिनाभरातच कोट्यवधींची कमाई

Rocket Share : या कंपनीने गेल्या वर्षीच आजच्याच दिवशी 29 सप्टेंबर 2022 रोजी निच्चांकी कामगिरी केली होती. हा शेअर 52 आठवड्यांच्या निच्चांकावर 1,798 रुपयांवर उतरला होता. त्यानंतर आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये 70 टक्के तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांना पैसा ठेवायला जागा कमी पडत आहे.

Rocket Share : गगनयान मोहिमेपूर्वीच रॉकेट झाला या कंपनीचा शेअर, महिनाभरातच कोट्यवधींची कमाई
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:59 PM

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : अगोदर चंद्रयान-3, मग आदित्य एल1 आणि आता गगनयानची मोहिम, इस्रो एक एक रेकॉर्ड नावावर नोंदवत आहे. या सर्वच मिशनमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या या कंपनीची कमाई पण काही केल्या थांबताना दिसत नाही. गगनयान (Gaganyaan Mission) सुरु होण्यापूर्वीच कंपनीच्या शेअरमध्ये (Share Market) मोठी तेजी आली आहे. 30 ऑगस्टपासून या कंपनीच्या शेअरने आतापर्यंत 13 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. या घडामोडी घडत असताना कंपनीचे बाजारातील भांडवल, महसुलात जोरदार वाढ झाली. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 49 हजार कोटी रुपयांनी वाढले. आज कंपनीने तर सर्वकालीन उच्चांक गाठला. आगामी काळात नवनवीन ऑर्डरच्या जोरावर ही कंपनी गगन भरारी घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

अशा मिळाल्या ऑर्डर

या कंपनीला मुंबई महापालिका प्रशासनाकडून 49 हजार कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. यापूर्वी कंपनीला सौदी अरबच्या अरामको समूहाकडून जवळपास 4 अब्ज रुपयांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. तंत्रज्ञान आणि बांधकाम या दोन्ही क्षेत्रात कंपनीचा कारभार चालतो. दोन्ही सेक्टरमध्ये जोरदार उसळी आली आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या शेअरमध्ये वाढ

शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी दिसून आली. BSE आकड्यांनुसार, दुपारी 12:14 वाजता कंपनीच्या शेअरमध्ये 22.10 रुपयांची वाढ झाली. हा शेअर 3033.95 रुपयांवर पोहचला. आज बाजार उघडताच कंपनीचा शेअर 3044.15 रुपयांवर ट्रेड करत होता. त्यानंतर हा शेअर 3006 रुपयावर पोहचला. तर एक दिवसापूर्वी शेअर 3011.85 रुपयांवर बंद झाला होता.

शेअर उच्चांकावर

सध्या हा शेअर त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. आकड्यांनुसार, या व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 1.49 टक्क्यांच्या तेजीसह 3057 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर 52 आठवड्यांच्या निच्चांकावर म्हणजे 1,798 रुपयांवर होता. त्यानंतर आतापर्यंत शेअरमध्ये 70 टक्के तेजी दिसून आली.

ही आहे कंपनी

लार्सन टुब्रो (Larsen and Tourbo) या कंपनीचा नफा थांबण्याचे नाव घेईना. बीएसई आकड्यानुसार या शेअरमध्ये जवळपास 13 टक्क्यांची तेजी दिसून आली. या 30 ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर 2708.80 रुपयांवर बंद झाला होता. यावेळी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी कंपनीचे बाजारातील भांडवल 4,29,706.81 कोटी रुपये होते. एकाच महिन्यात यामध्ये 49 हजार कोटी रुपयांची वाढ दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.