रोल्स रॉयसची नवी गाडी भारतात, किंमत तब्बल…..
नवी दिल्ली : जगभरात महागड्या गाड्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रोल्स रॉयस (Rolls-Royce) या ब्रिटिश कंपनीने नवीन गाडी SUV Cullinan भारतात लाँच केली आहे. रोल्स रॉयसचा हा मॉडेल लाँच होण्याआधीच याची जोरदार चर्चा भारतीय बाजारपेठेत चालू होती. मात्र आता भारतातही ही गाडी लाँच झाल्याने या गाडीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोल्स रॉयसच्या नवीन गाडीची किंमत 6.95 […]
नवी दिल्ली : जगभरात महागड्या गाड्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या रोल्स रॉयस (Rolls-Royce) या ब्रिटिश कंपनीने नवीन गाडी SUV Cullinan भारतात लाँच केली आहे. रोल्स रॉयसचा हा मॉडेल लाँच होण्याआधीच याची जोरदार चर्चा भारतीय बाजारपेठेत चालू होती. मात्र आता भारतातही ही गाडी लाँच झाल्याने या गाडीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
रोल्स रॉयसच्या नवीन गाडीची किंमत 6.95 (एक्स शोरुम) कोटी रुपये आहे. भारतात लाँच करण्यात आलेली ही पहिली SUV आहे. गाडीमध्ये 6.75 लीटर V12 इंजिन दिलं आहे, जे 563bhp पॉवर आणि 850Nm चा टॉर्क जनरेट करते.
नवीन रोल्स रॉयसच्या SUV CUllinan गाडीमध्ये ब्लू-रे प्लेयर, एक टीव्ही आणि बिस्पोक ऑडियो सिस्टम सोबत 18 स्पीकर दिले आहेत. डॅशबोर्डवर इन्फोटेनमेंट सिस्टम, मागे बसणाऱ्या प्रवाशासाठी हाय-डेफिनेशन 12 इंच टचस्क्रिनचा मॉनिटर्स दिला आहे.
गाडीत 4 कॅमेरासोबत पॅनारॉमिक व्ह्यू, अॅक्टिव्ह क्रूज कंट्रोल, वाय-फाय, हॉटस्पॉट, नाईट व्हिजन फंक्शन, हेड-अप डिस्प्ले दिला आहे. सुरक्षिततेसाठी गाडीमध्ये कोलिजन, क्रॉस ट्रॅफिक आणि लेन डिपार्चर वॉर्निंग्सही दिले आहे.
गाडीमध्ये लेदरची सीट, बीस्पोक फॅब्रिक्स आणि कार्पोरेट्स, पॉवर सीट्ससोबत मसाज फंक्शन, कनेक्टिविटी आणि नेविगेशन दिले आहे. तसेच गाडीमध्ये काही ठिकाणी मेटलचा वापरही करण्यात आला आहे.