AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RUCHI SOYA : गुंतवणुकदारांनो दाखवा ‘रुची’; कर्ज फेडीसाठी बाबा रामदेवांचा ‘एफपीओ’!

भारतातील रुचि सोया उत्पादन हे सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिक यासारख्या ब्रँडचा त्यात समावेश आहे.

RUCHI SOYA : गुंतवणुकदारांनो दाखवा ‘रुची’; कर्ज फेडीसाठी बाबा रामदेवांचा ‘एफपीओ’!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 8:21 PM

नवी दिल्ली : डबघाईला आलेल्या रुचि सोया (Ruchi Soya) कंपनीला योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev)यांनी बुस्टर दिला आहे. त्यामुळे रुचि सोयाला पुन्हा एकदा उर्जितावस्था प्राप्त झाल्याचं चित्र आहे. रुचि सोयाचा 17 रुपये किंमतीचा शेअर 1500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. गुंतवणुकदारांची अल्प काळातच चांदी झाली असून शेअर्सवर गुंतवणुकदारांच्या उड्या पडत आहे. रुचि सोया खरेदी व्यवहारावेळी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बाबा रामदेव यांनी एफपीओचा मार्ग अवलंबला आहे. गुंतवणुकदारांना सवलतीनं शेअरची विक्री करुन कर्जमुक्त होण्याची रणनीती आखली आहे. एफपीओ (follow on public offer) हा शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टेड) कंपन्यांकडून निधी उभारणीचा मार्ग मानला जातो.

गुंतवणुकदारांनो दाखवा ‘रुची’

योगगुरु बाबा रामदेव यांच्या रुची सोया या खाद्यतेल कंपनीचं नाव सध्या बाजारात चांगलंच चर्चेत आहे. या कंपनीवर मालकी हक्क पतंजली आयुर्वेदचा आहे. रुची सोया कंपनीने कोरोना काळात गुंतवणुकदारांना मालामाल केलं. कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत जाऊन पोहचली आहे. तब्बल 9600 टक्के वाढ नोंदविली गेली. सेबीच्या नियमांमुळे कंपनीला एफपीओ निर्णय घ्यावा लागलाय. त्यामुळे लवकरच या कंपनीत शेअर खरेदी करण्याची मोठी संधी गुंतवणुकदारांना उपलब्ध होणार आहे.

रुचि सोया ‘एफपीओ’ दृष्टीक्षेपात

• FPO 24 ते 28 मार्च पर्यंत ओपनिंग • इश्यू साईझ : ₹4300 कोटी • प्राईस बँड : 615-650 प्रति शेअर • लॉट साईझ : 21 शेअर • किमान गुंतवणूक : ₹13,650 • शेअर वितरण : 5 एप्रिल • डिस्काउंट : 35-39 टक्के

..’हा’ नियम महत्वाचा

रुची सोयाच्या प्रमोटर्सकडे या कंपनीचे तब्बल 98.90 टक्के शेअर्स आहेत. केवळ 1.1 टक्के शेअर्स सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडे आहे. मात्र, सेबीच्या नियमानुसार, कोणत्याही सार्वजनिक कंपनीला आपल्या शेअर्सपैकी किमान 25 टक्के शेअर्स सामान्य गुंतवणुकदारांना द्यावे लागतात. कंपनीला स्वतःकडे जास्तीत जास्त 75 टक्के शेअर्स ठेवता येतात. याच नियमानुसार रुची सोया कंपनीला 25 टक्के शेअर्स विकावे लागणार आहेत.

असा व्यवहार, अशी विक्री

भारतातील रुचि सोया उत्पादन हे सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. न्यूट्रिला, महाकोश, रुची गोल्ड, रुचि स्टार आणि सनरिक यासारख्या ब्रँडचा त्यात समावेश आहे. रुचि सोया एके काळी कर्जात बुडाली होती. अशा परिस्थितीत पंतजली आयुर्वेदने वर्ष 2019 मध्ये ती खरेदी केली होती. यासाठी स्वत: पतंजलीला 3200 कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले.

इतर बातम्या :

पाच राज्यातील पराभवातून महाराष्ट्र काँग्रेसनं काय धडा घेतला? डिजीटल सदस्य नोंदणीत 10 लाखाचा टप्पाही अपूर्ण!

SHARE MARKET : शेअर बाजारात घसरण, विक्रीचा वाढता ओघ; सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.