रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम

गेल्या जवळपास दहा दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरु आहे. या युध्दाचा विपरीत परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. क्रुड ऑइल, सोनं, चांदी, नैसर्गिक वायूसह अनेक गोष्टी महागल्या आहेत. सोबत रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा सर्वात वाईट परिणाम युरोपातील मोठ्या बँकांवर होणार असल्याचे मानले जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जगाची आर्थिक कोंडी? सविस्तर वाचा काय होतील परिणाम
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 6:59 PM

जगाला ‘ग्लोबल व्हिलेज’ (Global Village) म्हटलं जातं. त्यामुळे साहजिकच रशिया-युक्रेन संकटामुळे इतर देशांवर आर्थिक (Global economy) संकट येऊ शकते का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. कोरोना महामारीनंतर युक्रेनच्या संकटाने जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियन बँका इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीम (SWIFT) पासून विभक्त झाल्या आहेत. रशियन सरकार आणि पाश्चात्य देशांतील कंपन्यांची सर्व मालमत्ता गोठवण्यात आली आहे. याशिवाय रशियाची 630 अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी देखील वापरणे बंद करण्यात आले आहे. रशियावर लादलेल्या सर्व आर्थिक निर्बंधांमुळे रेटिंग एजन्सींनी रशियाचे सार्वभौम रेटिंग कमी केले आहे. ‘मूडीज’ आणि ‘फिच’ने रशियाचे रेटिंग कमी करुन जंक केले आहे. याचाच अर्थ आता ते गुंतवणुकीसाठी सुरक्षित राहिलेले नाही. अशा अनेक बँका आहेत ज्यांचे रशियावरील कर्ज 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांना आता डिफॉल्टची भीती वाटत आहे. यामुळे 2008 सारखे आर्थिक संकट सुरू होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

युरोपातील बँकांचे सर्वाधिक नुकसान

रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा सर्वात वाईट परिणाम ज्यांनी रशियात कर्ज वाटप केले आहेत, अशा युरोपातील मोठ्या बँकांवर होणार असल्याचे मानले जात आहे. युरोपमध्ये विशेषतः ऑस्ट्रिया, फ्रान्स आणि इटलीला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटच्या अहवालानुसार, फ्रान्स आणि इटलीमधील बँकांचे रशियामध्ये 25 अब्ज डॉलर्स एक्सपोजर आहे, तर ऑस्ट्रियन बँकांचे रशियामध्ये 17.5 अब्ज डॉलर्स एक्सपोजर आहे. 2014 मध्ये क्रिमियाला वेगळ केल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील दुरावा अधिक वाढत गेला. असे असूनही, सिटीग्रुपचा रशियात 10 अब्ज डॉलर्स एक्सपोजर आहे. सिटीबँकची मालमत्ता 2.3 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे.

रशियाशिवाय युक्रेनची अर्थव्यवस्थाही खालावली आहे. रशियासोबतच युक्रेनदेखील त्याचे कर्ज फेडण्यात डिफॉल्ट करेल. युक्रेनचे 60 अब्ज रोखे कर्ज रद्द केले गेले आहे. ज्या बँकांचे कामकाज रशिया आणि युक्रेनमध्ये पसरले आहे, त्यांच्या कामकाजावर याचा वाईट परिणाम झाला आहे. युक्रेन संकटामुळे फ्रान्सची आंतरराष्ट्रीय बँक बीएनपी परिबास आणि क्रेडिट अॅग्रिकोलवर वाईट परिणाम होईल, असा अंदाज जागतिक रेटिंग एजन्सी फिचने व्यक्त केला आहे.

बँकिंग क्षेत्रासाठी मोठा धोका

फ्रेंच बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक Société Générale आणि इटलीची UniCredit रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. रशियाला दिलेल्या कर्जात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अशा युध्दस्क्षितीचा त्यांनाही फटका बसू शकतो. या सर्वांशिवाय, युरोपियन बँकांसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे युरो स्वॅप मार्केटमध्ये अमेरिकन डॉलर्स गोळा करण्यासाठी त्यांना अधिक शुल्क द्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्या मार्जिनवर परिणाम होत आहे. एकूणच, रशियाचा हल्ला बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठा धोका आहे. कारण डिफॉल्टचा धोका लक्षणीय वाढला आहे.

या देशांवर अधिक परिणाम

रशियातील श्रीमंत वर्ग स्वित्झर्लंड, सायप्रस आणि यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा करतो. याचा बँकांना मोठा फायदा होतो. रशियावरील निर्बंधांमुळे या देशांच्या वित्तीय संस्थांवर वाईट परिणाम होणार आहे. युकेच्या किरकोळ व्यापारी बँका लॉयड्स आणि नॅटवेस्टचे शेअर्स या युद्धाच्या सुरुवातीपासून 10 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. रशियन चलन रुबल 30 टक्क्यांनी घसरले आहे. रॉयटर्सच्या मते, रशियामध्ये अमेरिकन कंपन्यांचे एक्सपोजर 15 अब्ज डॉलर्स इकते आहे. जे अखेरीस राइट ऑफ केले जाईल.

युरोपियन कंपन्यांची मोठी गुंतवणूक

याशिवाय ब्रिटिश तेल कंपनी शेल आणि बीपी यांनी रशियन कंपन्यांमधील आपली गुंतवणूक काढून घेणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय अनेक युरोपीय कंपन्यांची रशियात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. अशा परिस्थितीत या कंपन्यांचे मोठे नुकसान होणार आहे कारण सध्याच्या परिस्थितीत खरेदीदार उपलब्ध होणार नाही आणि तो सापडला तर किंमत खूपच कमी होईल. यामुळे घाबरून विक्रीचा धोका वाढतो. 2007-08 च्या संकटातही असेच घडले होते.

संबंधित बातम्या

नॅनो नंतर आता इलेक्ट्रिक नॅनो लवकरच येणार बाजारात? गाडी पाहून रतन टाटा म्हणाले…

गेल्या आठवड्यात सेन्सेक्सची 1500 अंकांनी घसरगुंडी! तब्बल 3.2 लाख कोटींचा चुराडा

रोजगारावर आता कोरोनाचा परिणाम जाणवणार नाही, नोकऱ्या मिळत राहणार – सर्व्हे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.