पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका उडणार, लिटरमागं 9 रुपयांची वाढ होणार, महागाईचे चटके वाढणार?
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांची किंमत वर्ष 2014 नंतर पहिल्यांदा 110 डॉलर प्रति बॅरल वर पोहचली आहे. भारताची क्रूड बास्केट 1 मार्चला 102 डॉलर प्रति बॅरल होती.
देशात गेल्या चार महिन्यापासून तेलाच्या किंमतीमध्ये असलेली स्थिरता लवकरच संपुष्टात येणार आहे. कच्च्या तेलाच्या (crude oil) किमती गगनाला भिडणार आहेत. सोबतच अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे की,पेट्रोल आणि डिझेल (Petrol and diesel) यांच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे की, ही वाढ नेमकी कधी आणि किती होणार आहे. एका ब्रोकरेज फर्मने असे सांगितले आहे की, पुढच्या आठवड्यामध्ये देशात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका ही संपणार आहेत. अशावेळी पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतीमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते, असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. फर्मच्या मते, सध्या तेल कंपन्यांना तोटा भरून काढण्यासाठी इंधनाच्या किंमतीमध्ये (Oil Marketing Companies) 9 रुपये प्रति लिटर वाढ करण्याची गरज आहे. म्हणजेच जर किमती याच स्तरावर राहतील तर कंपनी हळूहळू पेट्रोलच्या किंमतीमध्ये 9 रुपये प्रति लिटर वाढ होऊ शकते.
तोट्यात आहेत तेल कंपन्या??
ब्रोकरेज कंपनी जे.पी. मॉर्गन ने एका रिपोर्ट मध्ये म्हंटले आहे की, पुढच्या आठवड्यापर्यंत राज्यातील विधानसभा निवडणूक संपतील. असा अंदाज आहे की, त्यानंतर इंधन दरामध्ये दैनंदिन आधारावर वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक शेवटच्या प्रक्रियेतील मतदान 7 मार्चला तसेच उत्तर प्रदेश बरोबरच सगळ्या 5 राज्यातील मतगणना 10 मार्चला पूर्ण होईल. तेलाच्या किंमती वाढल्याने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑयल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियमला पेट्रोल आणि डीजल वर 5.7 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे. जे.पी. मॉर्गन नुसार, तेल मार्केटिंग कंपनीना सामान्य मार्केटिंग प्रॉफिट मिळवण्यासाठी होलसेल तेलाच्या किमती मध्ये 9 रुपये प्रति लिटर किंवा 10 टक्के वाढ करण्याची गरज आहे. घरगुती पातळीवर इंधनाच्या दरामध्ये कोणताच बदल केला गेला नाहीये.
110 डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहचले ब्रेंट
रशियाकडून तेलाचा पुरवठामध्ये अडथळा येण्याच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची किंमत 2014 नंतर पहिल्यांदाच 110 डॉलर प्रति बॅनर पर्यंत पोहोचले आहे. IEA च्या सदस्य देशांनी आपल्या स्ट्रेटजिक रिजर्व द्वारे 6 कोटी बॅरेल तेल सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी होते, त्यामुळे दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. रॉयटर्स ने बाजारातील तज्ञ मंडळीच्या मतानुसार , सध्या काही काळ ब्रेंट क्रूड 100 डॉलर प्रति बॅरेलवरच राहू शकतो. पेट्रोलियम मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम योजना आणि विश्लेषण प्रकोष्ठ (पीपीएसी) नुसार भारत कच्चे तेल खरेदी करते त्याची किंमत एक मार्चला 102 डॉलर प्रति बॅरेल ने अधिक वाढली आहे. इंधनाचे हे मूल्य ऑगस्ट 2014 नंतर सर्वात जास्त वाढलेले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली होती. परंतु त्यावर सुद्धा लगाम लावण्यात आला होता. तेव्हा कच्चे तेलाची सरासरी किंमत 81.5 डॉलर प्रति बॅरल एवढी होती.
इतर बातम्या: