…तर पेट्रोल, डिझेलसह भाज्यांचेही दर वाढणार, जाणून घ्या कारण

कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise)

...तर पेट्रोल, डिझेलसह भाज्यांचेही दर वाढणार, जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 4:52 PM

मुंबई : कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मागणी आणि वितरणाच्या साखळीवर पडू शकते. कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात पडू शकतो. कारण महागाई वाढू शकते (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise).

कोरोना संकट काळात कच्च्या तेलाच्या मागणीत स्थिरता होती. भारतासह इतर देशांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयाने भारतासह इतर देशांमध्येही महागाई वाढू शकते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वितरणात मोठा फटका बसू शकतो.

महागाई कशी वाढणार?

सौदी अरेबिया देश कच्च्या तेलाच्या वितरणात घट करु शकतो. त्यामुळे फेब्रुवारीपासून तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. तेलाचे दर वाढल्यानंतर परिवहन क्षेत्राला याचा मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर महागाईदेखील वाढू शकते. कारण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम इतर उत्पादनांवर पडू शकतो. त्यामुळे महागाई वाढू शकते. विशेष म्हणजे भाज्यांचे दर वाढू शकतात.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

कोरोना संकट काळात भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांदा आणि टोमॅटोचे दर सोडले तर इतर सर्व भाज्यांचे दर सध्या स्थिर आहे. तेलच्या वितरणात घट झाल्यास भाज्यांच्या किंमतीवर त्याचा थेट परिणाम पडू शकतो (Saudi Arabia to cut oil output in February and march commodities cost may rise).

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.