Post Office Scheme : 1000 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला कमवाल पैसा

या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खातं उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता.

Post Office Scheme : 1000 रुपयांनी सुरू करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला कमवाल पैसा
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 8:24 AM

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं हा नेहमीच एक सुरक्षित पर्याय आहे. इथं आपले पैसे देखील सुरक्षित आहेत आणि आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं. मासिक उत्पन्न योजना (POMIS) ही अशीच एक छोटी बचत योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला दरमहा पैसे मिळवण्याची संधी मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम कमवू शकता. या योजनेंतर्गत तुम्ही एकल किंवा संयुक्त खातं उघडू शकता आणि एकमुखी रक्कम जमा करू शकता. (save money post office monthly income scheme interest rate benefits tenure all details)

गुंतवणूकीवर कमवा दरमहा

या खात्यात जमा झालेल्या, रकमेनुसार दरमहा तुमच्या खात्यात कमाईची रक्कम येतच राहते. या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. पण तो पुढे 5-5 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करु शकतो. Post Office योजनेत गुंतवणुकीवर कोणताही धोका नाही. इथं तुमच्या गुंतवणुकीवर सरकारी सुरक्षेची 100 टक्के हमी आहे.

या योजनेतून चांगलं उत्पन्न मिळतं. ज्या ग्राहकांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवायचं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणं सगळ्यात फायदेशीर आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर एकरकमी रक्कम मिळते त्यांच्यासाठी ही योजना अतिशय चांगली आहे. एकरकमी गुंतवणुकीद्वारे दरमहा निश्चित उत्पन्न मिळू शकते.

कसं उघडाल खातं ?

या योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. खातं उघडण्यासाठी तुम्हाला आयडी पुरावा द्यावा लागेल. यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, डीएल किंवा पासपोर्ट द्यावं लागेल. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सुद्धा खातं उघडण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अ‍ॅड्रेस प्रूफसाठी एखादं ओळखपत्र, लाईट बिल, नगरपालिका बिल, निवासी प्रमाणपत्र किंवा शासकीय विभागाने दिलेला अन्य पुरावा असावा.

तुम्हाला कसा मिळेल फायदा ?

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेसाठी चालू तिमाहीत सरकारने वार्षिक व्याज दर 6.6 टक्के निश्चित केला आहे. म्हणजे जर तुम्ही योजनेत 9 लाख रुपये जमा केले तर या रकमेवरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे एकूण व्याज 59,400 रुपये असणार आहे.

जर ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली गेली तर दरमहा व्याज सुमारे 4950 रुपये असेल. एकाच खात्यातून तुम्ही 4,50,000 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर दरमहा व्याज म्हणून 2475 रुपये कमवाल. (save money post office monthly income scheme interest rate benefits tenure all details)

संबंधित बातम्या – 

LIC Jeevan Lakshya : 105% परतावा देणारी धमाकेदार योजना, सुखी आयुष्यासाठी आताच करा प्लॅन

Petrol-Diesel Price Today : आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या काय आहेत किंमती, वाचा ताजे दर

LIC चा मोठा निर्णय! आता देशातल्या कुठल्याही शाखेमध्ये देऊ शकता ‘हे’ महत्त्वाचं कागदपत्रं

(save money post office monthly income scheme interest rate benefits tenure all details)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.