Salary Hike : पगार वाढल्यानंतर लगेचच करा ‘ही’ कामं, पगारवाढीचा आनंद होईल दुप्पट
पण पगारवाढीचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण ते पैसे कसे वापरावे, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे तुमचे भविष्य सुधारु शकते (Do These Things After Salary Hike)
मुंबई : पगारवाढ ही सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असते. पगार वाढल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण पार्टी करतात. काही जण थोडकी पार्टी करतात, तर काही मोठी जंगी पार्टी करतात. तर काही जण पगारवाढीनंतर 2 ते 3 महिन्यांचा पगार एकत्र उडवतात. पण पगारवाढीचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण ते पैसे कसे वापरावे, याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे तुमचे भविष्य सुधारु शकते. त्यामुळे जर तुमची पगारवाढ झाली असेल तर तुम्ही तुमचा वाढीव पगार कसा खर्च करावा? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Saving And Investment Do These Things After Salary Hike)
?गुंतवणूक वाढवा, खर्च नाही
गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढली आहे. त्याचा सामना करताना तुमचा खर्चही वाढतो. पण पगार वाढल्यानंतर तुम्हाला खर्चाला आवश्यक असतील तेवढेच पैसे खर्च करा. त्यातून उरलेले पैशांची गुंतवणूक करा. म्हणजेच समजा जर तुम्ही सध्या पगाराच्या 20 टक्के गुंतवणूक करत असाल आणि तुमची पगारवाढ 10 टक्क्यांनी झाली असेल तर तुम्ही गुंतवणूकीत कमीत कमी 3-5 टक्क्यांनी वाढ करा. त्यामुळे तुमची गुंतवणूक वाढेल. तसेच गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला करपात्र उत्पन्न कमी करण्यात मदत होईल.
?आपत्कालीन निधीत गुंतवणूक गरजेची
कोरोना काळात आपत्कालीन निधी किती गरजेचा आहे, याची जाणीव अनेकांना झाली आहे. जर तुम्हीही आपत्कालीन निधी (Emergency Fund) गुंतवणूक केली असेल तर मग वेतनवाढ झाल्यानंतर त्यातील रक्कम 2-3 टक्क्याने वाढवा. आपत्कालीन निधीतील गुंतवणूक ही फार महत्त्वाची असते. यातील पैसे हे आवश्यक असल्यास त्वरित काढता येतात. यात तुमच्या बँक अकाऊंटच्या बचत खात्यातील पैशांचाही समावेश आहे. यातील पैशांवर फार कमी व्याज मिळत असला, तरी गरज लागल्यास हे पैसे तुम्हाला काही सेकंदात मिळतात. तसेच ऑनलाईनही तुम्ही हे पैसे ट्रान्सफर करु शकता.
?ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका
पगार वाढल्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयाकडील वाटचाल आणखी दृढपणे करायला हवी. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादे घर किंवा कार विकत घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी पैसे उभे करत असाल तर त्यासाठीची गुंतवणूक वाढवा. यामुळे तुम्ही तुमचे ध्येय आणखी लवकर गाठू शकता.
अनेकदा काही जण या गोष्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात. पण जर तुमचा पगार चांगला असेल तर 1 ते 2 वर्ष बचत केल्यास तुम्ही आरामात गाडी खरेदी करु शकता. तसेच पाच ते सहा वर्ष बचत केल्यास घर खरेदी करण्याइतका पैसा तुम्ही जमा करु शकता. त्यामुळे तुम्ही कर्जाच्या चक्रात अडकले जाणार नाही.
?लवकरात लवकर कर्ज फेडा
जास्तीत जास्त पैसे बचत करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या अंगावर असलेले कर्ज फेडा. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात तुमचे कर्ज कमी असते. जर तुमच्या पालकांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले असेल तर सर्वप्रथम ते कर्ज फेडा. यामुळे सततचा व्याजचा पैसा वाचेल. तसेच तुमच्यावरची मोठी जबाबदारी कमी होईल. पगार वाढीनंतर तुमचे कर्ज नेमकं किती आहे याचा नीट अभ्यास करा. ते तुम्ही कसे फेडू शकता याचे आर्थिक गणित मांडा. जर तुम्हाला कित्येक महिन्यापासूनचे पगारवाढीचे पैसे एकत्रित मिळाले असतील तर ते खर्च करण्यापूर्वी विचार करा.
?विमा संरक्षण आणि सेवानिवृत्तीसंबंधित योजनेत गुंतवणूक करा
जर आपले विमा संरक्षण कमी असेल तर पगार वाढल्यावर आपण आपले विमा संरक्षण वाढवू शकता. तसेच दुसरीकडे जर तुम्ही सेवानिवृत्तीसाठी एखादी योजना आखली नसेल तर तुम्ही सेवानिवृत्तीचे नियोजन करू शकता. त्याशिवाय जर तुम्ही सेवानिवृत्तीचे नियोजन केले असेल तर तुम्ही त्यातील गुंतवणूक वाढवू शकता. हे पैसे नंतर उपयुक्त ठरतात. सेवानिवृत्तीसाठी जी गुंतवणूक करमुक्त आहे, अशा गुंतवणूकीवर भर द्या. (Saving And Investment Do These Things After Salary Hike)
संबंधित बातम्या :
7th pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Double Good News, पगारवाढीपाठोपाठ प्रमोशनही होणार
एलआयसीकडे तुमचे पैसे आहेत, पण तुम्हाला ठाऊक नाही; जाणून घ्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रक्कम