ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स

अशा परिस्थितीत जर तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही कंपनीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता कमवू शकता (Income Sources To Build Wealth during Job)

ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 11:07 AM

मुंबई : पैसा कमावण्यासाठी आपल्यातील अनेक लोक नोकरी करतात. पण नोकरी करुन पगार कमवूनही अनेकांचा पैसा जमा होत नाही. त्यामुळे अनेकांना सेकेंड इन्कम सोर्स तयार करायचा असतो. पण अनेक कंपन्यांच्या कराराप्रमाणे ते इतर कोणतेही काम करु शकत नाहीत. तसेच ते पार्ट टाईम नोकरीही करु शकत नाही. (Income Sources To Build Wealth during Job)

अशा परिस्थितीत जर तुम्हाला अतिरिक्त पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही कंपनीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता कमवू शकता. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागू शकतो असेही नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अशा काही अशा गोष्टी सांगू शकतो, ज्यामुळे तुम्ही सातत्याने कमाई करु शकता.

1) शेअर बाजारात करा गुंतवणूक

जर तुम्ही शेअर बाजारात योग्य वेळी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर काही वर्षानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. पण शेअर बाजारात गुंतवणूक करणे म्हणजे एखाद्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासारखे नाही. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला त्याबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही ज्या कंपनीत पैसे गुंतवणूक करणार आहात, त्याची योग्य माहिती घ्या. सध्या ज्या कंपनीची स्थिती मजबूत आहे, त्याच कंपनीत पैसे गुंतवा. जर तुम्ही योग्य शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्रचंड नफा मिळू शकतो.

2) म्युच्युअल फंड उत्तम पर्याय

बर्‍याच लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोकादायक वाटते. त्यामुळे अनेकजणांना जोखीम असल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे अशा लोकांसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय असतो. मात्र चांगला म्युच्युअल फंड निवडण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ खर्च करावा लागू शकतो. म्युच्युअल फंडांच्या माध्यमातूनही शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक केली जाते. तसेच शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यात फार कमी धोका असतो. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक करणे सुरु कराल, तेवढा तुम्हाला अधिक नफा मिळेल.

3) चांगला व्याज देणारी योजना

अनेक बँका गुंतवणूकीसाठी बऱ्याच योजना सुरु करतात. यातील एक योजना म्हणजे FD. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे कधीही योग्य समजले जाते. जी बँक तुम्हाला चांगला परतावा देते, त्यात पैसे गुंतवण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा तुम्ही जितक्या लवकर आपण गुंतवणूक कराल, तितक्या लवकर तुम्हाला परतावा मिळेल. तसेच चक्रवाढ व्याजामुळे तुम्हाला कमावलेल्या व्याजावरही व्याज मिळू शकतो. तर दुसरीकडे, आपण सेवानिवृत्तीचा विचार करुन गुंतवणूक करत असाल तर आपण पीपीएफमध्येही गुंतवणूक करू शकता. तिथे तुम्हाला उत्तम परतावा मिळेल. (Income Sources To Build Wealth during Job)

संबंधित बातम्या : 

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.