महिन्याला कमाई केवळ 25,000 रुपये, तरीही जमवा 1 कोटी, जादू कसली, हा आहे बचतीचा फॉर्म्युला
Monthly Saving : आयुष्याच्या एका टप्प्यात पैशांची गरज असते आणि त्यावेळी आपल्याकडून काम होत नाही. थकलेले शरीर पुढे धावू देत नाही. योग्यवेळी केलेली गुंतवणूक तुमच्या कामी येऊ शकते. 25,000 रुपये महिन्यात पण एक कोटींचा निधी उभारता येतो.
आयुष्याच्या संध्याकाळी शरीर थकलेले असते तेव्हा पैशांची गरज असते. पण शरीर फारशी साथ देत नाही. पण योग्यवेळी बचत केली, गुंतवणूक केली तर उतारवयात मोठी रक्कम गाठिशी असते. 25,000 रुपये महिना कमाई असताना तुम्हाला काही वर्षांत 1 कोटींचा निधी उभारता येतो. त्यासाठी तुम्हाला महिन्याला आतापासूनच एक ठराविक रक्कम बचत करावी लागेल. तुम्ही म्हणाल या महागाईच्या काळात कसली आलीये बचत? पण वारेमाफ खर्चाला आळा घातला आणि स्वयं आर्थिकशिस्त लावली तर ही गोष्ट साध्य करता येईल.
पगारातील एक ठराविक रक्कम गुंतवल्यास तुम्हाला तुमचे एक कोटीचे लक्ष गाठता येईल. तुमचा पगार 25,000 ते 35,000 रुपयांदरम्यान असल्यास या गणिताने तुमची बचत फायद्याची ठरू शकते. कमी पगारातही आर्थिक उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतात.
इक्विटी म्युच्युअल फंडात SIP
छोट्या गुंतवणुकीतून मोठा फंड जमा करु इच्छित असाल तर SIP च्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर पर्याय ठरु शकतो. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये नियमीतपणे महिन्याला एक निश्चित रक्कम जमा केल्यास फायदा होईल. छोटी रक्कम असली तर ती भविष्यात मोठा फंड तयार करेल. तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा होईल.
प्रत्येक महिन्याला किती बचत गरजेची?
- जर तुमचा पगार मासिक 25,000 रुपये असेल तर प्रत्येक महिन्यात 15-20% बचतीचे लक्ष्य ठेवा. तुम्ही दरमहा 4,000 रुपये एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक कराल तर भविष्यात मोठी रक्कम गाठिशी असेल. या रक्कमेवर 12% वार्षिक परतावा मिळाला तर तुम्हाला 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी 28 वर्ष (339 महिने) लागतील. पण त्यासाठी नियमीत ही राशी दरमहा जमा करावी लागेल.
- जर तुम्ही दरमहा 5,000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर 26 वर्ष (317 महिने) पेक्षा अधिक वेळेत 1 कोटी रुपये वाचवू शकता. जर तुम्ही प्रत्येक महिन्यात 7,500 रुपये म्हणजे तुमच्या वेतनाच्या 30% रक्कम गुंतवत असाल तर 23 वर्षे वा 276 महिन्यात 1 कोटी रुपये जमा करु शकाल.कमी वेळेत मोठा फंड जमा करण्यासाठी काय करावे लागेल?
- जर तुम्हाला 1 कोटी रुपये जमा करण्यासाठी 28 वर्षांची वाट पाहायची नसेल तर प्रत्येक वर्षी एसआयपीची रक्कम 10% वाढवावी लागेल. प्रत्येक वर्षी तुमच्या पगारात काही ना काही वाढ होते. त्या वाढीव रक्कमेतील काही भाग एसआयपीत वाढवायचा आहे. या वाढीव एसआयपीतून तुम्ही 22 वर्षांत 1 कोटींचा फंड जमा करु शकता.