तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोमध्ये एक गुंतवणूक योजना ( Investment Plan)असायला हवी की जी तुम्हाला, आर्थिक संकटात मदतीचा हात पुढे करु शकेल. तसेच तुमच्याकडे खेळत्या भांडवलासह उत्तम परतावा देण्यातही ती सहायक ठरेल. व्यापारी, पगारदार अथवा गैरपगारदार यांनी बँकेत बचत खाते उघडायला हवे. बचत खात्यातील (Savings Account) रक्कमेवरील व्याजदर हे प्रत्येक दिवसावर आधारीत असतात. तर त्याचा परतावा दर तीन महिन्याला करण्यात येतो. 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर आणि 31 मार्च या दिवशी तुमच्या खात्यातील रक्कमेवर बँक तुम्हाला व्याज देते. सध्या अनेक बँकांची बचत खात्यावरील व्याजदर (Interest Rate) ग्राहकांसाठी चिंतेचा विषय झाला आहे, कारण अनेक बँकांनी व्याजदर कमालीचा कमी केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हाती व्याजापोटी येणारी रक्कम अत्यंत तोकडी असते. तरीही काही बँका ग्राहकांना चांगला व्याजदर देत आहेत. त्यामुळे त्यांना परतावा ही चांगला मिळत आहे.
तुमच्या उद्दिष्टांनुसार बँकेत वेगवेगळ्या प्रकारची बचत खाती आहेत. परंतू बचत खाता उघडण्याचा मुख्य आणि प्राथमिक उद्देश हा अल्पकालीन आर्थिक संकटांचा सामना करणे हाच आहे. ठेव विमा आणि ऋण हमी निगमकडून (DICGC) 5 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांना संरक्षण देण्यात येते. बचत खात्यात गंगाजळी चांगली असली तर दुहेरी फायदा होतो. एकतर बचतीवर व्याज मिळते आणि एक मोठी खेळती रक्कम ग्राहकाच्या हाती असते. जी गरजेच्यावेळी त्याच्या उपयोगी पडते.
व्याजदरांच्या बाबतीत विचार केला जातो, तेव्हा अनेक बँका कमी व्याज देत असल्याचे दिसते. अशावेळी खासगी क्षेत्रातील या तीन बँकांचा ग्राहकांपुढे चांगला पर्याय आहे. या बँका ग्राहकांना 6 टक्क्यांहून अधिकचा परतावा देत आहेत. लक्षात ठेवा, या बँकांना शीर्षस्थानी ठेवण्यामागे त्यांचे भागभांडवल किती आहे, याचा किंचितही विचार करण्यात आलेला नाही, केवळ त्या चांगला परतावा देत असल्याने त्यांची माहिती देत आहोत.
इतर बातम्या:
Mumbai Water : यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन नाही, पुढच्या 5 महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक!
LPG Price Hike : दूध महागलं, पेट्रोल डिझेलनंतर आता एलपीजी सिलेंडरही महागले, चेक करा आजचे रेट