Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्त झाल्यानंतर पीएफ खात्यातील पैशांवर व्याज मिळते? जाणून घ्या सर्वकाही

तसेच सेवानिवृत्तीच्या वयाआधी जर तुम्ही नोकरी सोडली तरी तुम्हाला एका विशिष्ट वेळेसाठी पीएफ खात्यात ठेवींवरील व्याज मिळते. (How Long Will You able to Get Interest On Epfo Account)

निवृत्त झाल्यानंतर पीएफ खात्यातील पैशांवर व्याज मिळते? जाणून घ्या सर्वकाही
EPFO
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 10:51 AM

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या भविष्याची काळजी घेते. यात कर्मचार्‍याच्या कार्यकाळात मालक आणि कर्मचारी या दोघांच्या वतीने नियमित योगदान दिले जाते. विशेष म्हणजे जर तुम्ही नोकरी सोडली तरीही तुमच्या पीएफ खात्यात पैसे विशिष्ट कालावधीसाठी व्याज जमा होतो. तसेच सेवानिवृत्तीच्या वयाआधी जर तुम्ही नोकरी सोडली तरी तुम्हाला एका विशिष्ट वेळेसाठी पीएफ खात्यात ठेवींवरील व्याज मिळते. (Savings And Investments After Leaving Job How Long Will You able to Get Interest On Epfo Account)

निश्चित कालावधी किती?

जर तुम्ही 55 वर्षे वयानंतर आणि 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे रिटायरमेंटपूर्वी नोकरी सोडली, तर तुम्हाला पुढील 3 वर्ष त्या नोकरीशी संबंधित असलेल्या पीएफ खात्यावर व्याज जमा मिळतो. जरी तुम्ही यात कोणतेही योगदान दिले नाही, तरी देखील ही रक्कम जमा होत राहते.

जर त्या संबंधित व्यक्तीने पुढील 3 वर्ष म्हणजेच 36 महिन्यांत पीएफमधील पैसे काढले नाहीत तर ते ईपीएफ खाते बंद होते. एखादे ईपीएफ खाते बंद किंवा इनऑपरेटिव्ह झाल्यावर त्यावर तुम्हाला कोणताही व्याज दिला जात नाही. तर दुसरीकडे जर कोणी 55 वर्ष वयाच्या आधी नोकरी सोडली तर त्याला पीएफवरील व्याज कोणत्याही नवीन योगदानाशिवाय 58 वर्षापर्यंत उपलब्ध होईल.

?या परिस्थितीत खाते होते इनऑपरेटिव्ह

?एखादे ईपीएफ अकाऊंट बंद किंवा इनऑपरेटिव्ह होण्यासाठी काही ठराविक निष्कर्ष ठरवण्यात आले आहे. ?त्यासाठी काही अटी-शर्थी देखील ठेवण्यात आल्या आहेत. ? जर 55 वर्ष वयानंतर 36 महिन्यांचा आत कर्मचारी यावर काही तोडगा काढत नसेल तर ?ग्राहक परदेशात गेला तर ?एखाद्या ईपीएफओ सदस्याचा अकस्मात मृत्यू झाला तर ?नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर पीएफकडून पैसे काढण्यास पात्र ठरल्यापासून 36 महिन्यांत तोडगा न काढल्यास

खाते इनअॅक्टिव्ह झाल्यावर क्लेम नाही केलं तर…

एखादे पीएफ खाते सलग 7 वर्ष बंद किंवा इनअॅक्टिव्ह राहिले आणि तुम्ही त्यातील फंड क्लेम केला नाही, तर ती रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) योजनेत वर्ग केली जाते. एखाद्या पीएफ अकाऊंटमधून हस्तांतरित केलेली रक्कम ही ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये 25 वर्षे राहते. या दरम्यान पीएफ खातेधारक त्यावर दावा करु शकतात.

संबंधित बातम्या :

बँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत

Salary Overdraft: गरज पडल्यास काही मिनिटात पैसे मिळणार, या उपयोगी सुविधेचे नियम आणि अटी काय?

3 वर्षात तब्बल 9600 टक्क्यांचा बंपर फायदा देणारी रामदेव बाबांची कंपनी, पुन्हा एकदा गुंतवणुकीची संधी

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.