SBI ग्राहकांसाठी बँकेचा अलर्ट! KYC पडताळणीसाठी फोन किंवा मेसेज आला तर सावधान

एसबीआयने केवायसी पडताळणीसाठी (KYC Verification) येणाऱ्या बनावट कॉल किंवा मेसेजेसंबंधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे.

SBI ग्राहकांसाठी बँकेचा अलर्ट! KYC पडताळणीसाठी फोन किंवा मेसेज आला तर सावधान
त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने 75 दिवसांसाठी 4.45 टक्के, 525 दिवसांसाठी 5.60 टक्के व्याजाची घोषणा केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2250 दिवसांची कोणतीही अतिरिक्त व्याज योजना नाही.
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:57 PM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयमध्ये जर तुमचं खातं (Account) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या 42 कोटी ग्राहकांना महत्वाची माहिती दिली आहे. एसबीआयने केवायसी पडताळणीसाठी (KYC Verification) येणाऱ्या बनावट कॉल किंवा मेसेजेसंबंधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. एसबीआयने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. केवायसी पडताळणीतील येणारे कॉल्स किंवा मेसेजपासून सावध रहा असं एसबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे. (sbi alert customers on fraudulent calls or messages requesting kyc verification tips)

फसवणूकी झाल्यास बँकेला कळवा अहवाल द्या

एसबीआयने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “केवायसी पडताळणीसाठी खोटे कॉल किंवा मेसेज येत आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहा. तर एसबीआयने सुरक्षा सूचनांसाठी एक व्हिडिओ सामायिक केला आहे आणि अशा घटनांचा अहवाल https://cybercrime.gov.in वर पावण्यास सांगितले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

– कोणाबरोबरही ओटीपी (OTP) शेअर करू नका.

– रिमोट एक्सेस एप्लिकेशन (Remote Access Application) कोणालाही देऊ नका.

– आधारची (Aadhaar) प्रत अज्ञात व्यक्तीला शेअर करू नका.

– नवीन नंबरविषयी बँकेला माहिती द्या.

– वेळोवेळी तुमचा पासवर्ड बदला.

– तुमच्या मोबाइल आणि गोपनीय डेटा कोणाबरोबरही शेअर करू नका.

– कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

फसवणूक झाल्यास इथे करा संपर्क

फसवणूक झाल्यास ग्राहकांनी काय करावं याचीही माहिती एसबीआयकडून देण्यात आली आहे. तुमच्या बँक खात्यात एखादा अनधिकृत व्यवहार झाल्यास ताबडतोब टोल फ्री ग्राहक सेवा क्रमांक – 18004253800 आणि 1800112211 वर नोंदवा. तसेच, https://cybercrime.gov.in वर सायबर क्राइम नोंदवा. (sbi alert customers on fraudulent calls or messages requesting kyc verification tips)

इतर बातम्या –

जर 31 डिसेंबरला नाही भरला ITR तर काय होईल? काय आहे शेवटची तारीख?

Gold Silver Rate | सोने 50 हजारांच्या पार, चांदीचीही लखलख, जाणून घ्या दर

(sbi alert customers on fraudulent calls or messages requesting kyc verification tips)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.