SBI खातेधारकांसाठी अलर्ट, 1 जुलैपासून सेवा शुल्कात बदल, कोणत्या सेवेसाठी किती शुल्क?

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने येत्या 1 जुलैपासून बचत खात्यांसाठीच्या सेवा शुल्कांमध्ये बदल केले आहेत. (SBI BSBD account holders charges change)

SBI खातेधारकांसाठी अलर्ट, 1 जुलैपासून सेवा शुल्कात बदल, कोणत्या सेवेसाठी किती शुल्क?
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 1:26 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या SBI ने येत्या 1 जुलैपासून बचत खात्यांसाठीच्या सेवा शुल्कांमध्ये बदल केले आहेत. त्यात एटीएममधून पैसे काढणे, चेकबुक घेणे आणि आर्थिक कामांचाही समावेश आहे. SBI चे हे नवे शुल्क केवळ BSBD खात्यावर लागू होणार आहे. (SBI ATM cash withdrawal charges changed for BSBD account holders)

SBI च्या बचत खात्यासाठी आता विनामूल्य रोख व्यवहाराची मर्यादा 4 करण्यात आली आहे. यात बँकेतून पैसे काढणे आणि एटीएममधून पैसे काढणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी पैसे काढण्यासाठी 15 रुपये शुल्क आकारलं जाईल. हे शुल्क एटीएमसह शाखेतून पैसे काढण्यावरही लागू असेल. BSBD खाते उघडल्यानंतर, बँकेद्वारे तुम्हाला 10 चेकबुक पेज तुम्हाला विनामूल्य दिली जातात. यासाठी एका आर्थिक वर्षाची मर्यादा आहे. त्यानंतर प्रत्येक चेकबुकसाठी स्वतंत्र फी जमा करावी लागेल. मात्र NEFT, IMPS, RTGS हे व्यवहार पूर्णपणे विनामूल्य आहे.

कशाप्रकारे आकारतात शुल्क

जर एखाद्या वित्तीय वर्षात एखादा ग्राहक 10 विनामूल्य चेकबुक व्यतिरिक्त आणखी 10 पानांचे चेकबुक घेत असेल तर त्याच्याकडून 40 रुपये शुल्क आकारले जाईल. तर 25 पानांच्या चेकबुकसाठी 75 शुल्क आकारले जाईल. त्याशिवाय आपत्कालीन सेवा अंतर्गत येणाऱ्या चेकबुकच्या 10 पानांसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल. या शुल्कावर स्वतंत्रपणे जीएसटीचा समावेश असेल. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेही शुल्क नाही. BSBD अकाऊंटसह बँक RuPay कार्डही जारी करते. हे विनामूल्य असते.

बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी

बँक शाखांमधील कामकाजाचा कालावधी कमी झालेय. राज्यस्तरीय बँकर्स समितीने यासंदर्भात बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना संक्रमणापासून बँक कर्मचारी आणि ग्राहक दोघांचीही सुरक्षा लक्षात घेता कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत अनेक ग्राहक बँकेत 2 वाजेपर्यंत काम आटोपून निघून जायचे, परंतु त्यांना आता चार वाजेपर्यंत बँकेची कामं करता येणार आहे. तसेच एसबीआयनं बँकेच्या कामकाजाची वेळ वाढवल्यामुळे बँकेमध्ये होणारी गर्दीही कमी होणार आहे.

SBI ने सेवा शुल्काच्या नावखाली कमवले कोट्यावधी रुपये

दरम्यान नुकतंच एखाद्या BSBD खात्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला होता. आयआयटी बॉम्बेने केलेल्या अभ्यासानुसार, देशातील सर्वात मोठी सरकारी बँका आणि काही मोठ्या बँका गरिबांच्या खात्यातून सेवांच्या नावाखाली पैसे कमवत असल्याचे समोर आलं होतं. या अहवालानुसार, SBI ने गेल्या सहा वर्षात BSBD खातेधारकांकडून 308 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. सध्या SBI चे 12 कोटी BSBD खातेधारक आहेत. PNB च्या BSBD खातेधारकांची संख्या 3.9 कोटी आहे. या खातेधारकांकडून व्यवहार शुल्काच्या नावाखाली बँकेने 9.9 कोटी रुपये वसूल केले आहेत. (SBI ATM cash withdrawal charges changed for BSBD account holders)

संबंधित बातम्या : 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांनंतर 10 लाख रुपये मिळणार

लग्न करताय, मग त्यापूर्वी तुमच्या जोडीदाराला विचारा ‘हे’ प्रश्न, वैवाहिक जीवन होईल अधिक सोपे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.