SBI ग्राहकांनो सावधान! ऑनलाईन बँकिंग करतेवेळी कधीही करु नका ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान
एखाद्या बँकेच्या कामापासून ते खरेदीपर्यंत अवघ्या काही मिनिटांत स्मार्टफोनद्वारे ही काम करता येत असल्याने आपल्याला याची सवय झाली आहे. (SBI issues alert to customer against fraud lists points to stay safe)
मुंबई : सध्याच्या काळात सर्व काही ऑनलाईन करणं शक्य झालं आहे. लाईट बिल भरण्यापासून ते शॉपिंग करण्यापर्यंत सर्व गोष्टी आता एका क्लिकवर करणं सहज शक्य आहे. कोरोना काळात डिजीटल सेवांमुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे तुम्ही घरबसल्या सर्व कामे पूर्ण करु शकता. एखाद्या बँकेच्या कामापासून ते खरेदीपर्यंत अवघ्या काही मिनिटांत स्मार्टफोनद्वारे ही काम करता येत असल्याने आपल्याला याची सवय झाली आहे. (SBI issues alert to customer against fraud lists points to stay safe)
मात्र तुमच्या याच सवयींचा फायदा घेत काही सायबर चोरटे तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना अशा फसवणूकीपासून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नुकतंच एसबीआयने याबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्वीटद्वारे त्याने लाखो ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार SBI ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला दिला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्यांपासून सतर्क राहण्याचा सल्ला देत आहोत. तुमचा कोणताही संवेदनशील डेटा ऑनलाईन शेअर करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करुन अॅप डाउनलोड करू नका, अशी सूचना केली आहे.
We advise our customers to be alert of fraudsters and not to share any sensitive details online or download any app from an unknown source.#StaySafe #StaySecure #BeAlert #CyberSecurity #CyberSafety #SBIAapkeSaath pic.twitter.com/swhJjjlIcY
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 13, 2021
वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा
एसबीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही ग्राहकाने त्याची वैयक्तिक माहिती जसे की जन्मतारीख, डेबिट कार्ड नंबर, इंटरनेट बँकिंग यूजर आयडी / पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही, ओटीपी यासारखी माहिती कोणसोबत शेअर करु नका.
तसेच एसबीआय, आरबीआय, शासकीय कार्यालय, पोलीस, केवायसी प्राधिकरण अशा विविध नावाने फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. एसबीआय किंवा त्याचे कोणतेही प्रतिनिधी तुम्हाला कधीही ईमेल, एसएमएस पाठवत नाही. तसेच ते तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा वन टाईम पासवर्डसाठी फोन करत नाही. त्यामुळे तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करु नका.
फसव्या ऑफरला प्रतिसाद देऊ नका
कोणत्याही अज्ञात लिंकवर जाऊन मोबाईल अॅप डाऊनलोड करणं टाळा. तसेच अशाप्रकारे येणाऱ्या फसव्या मेलपासूनही सावध राहा. ईमेल, एसएमएस आणि इतर सोशल मीडियाद्वारे आलेल्या कोणत्याही ऑफरला प्रतिसाद देऊ नका. तुमची सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. त्यामुळे सुरक्षित राहा, अशी सूचना बँकेने दिली आहे.
दरम्यान देशात इंटरनेट वेगाने पसरत आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या घटनांचा तपास करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक सायबर सेल तयार करण्यात आला आहे. (SBI issues alert to customer against fraud lists points to stay safe)
Chanakya Niti | माणसाचा खरा मित्र, सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा आजार कोणता? जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतातhttps://t.co/Rc55Ho7zvy#ChanakyaNiti #AcharyaChanakya #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या :
आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा, अन्यथा होईल डोकेदुखी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
कर्जाची परतफेड करण्याआधीच कर्जदाराचं निधन झालं तर त्या लोनचं नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड वेरिफाय कसं करायचं? क्यूआर कोड वेरिफिकेशन म्हणजे काय? वाचा सविस्तर