SBIची खातेदारांना मोठी भेट, ITR फाईल करा एकदम मोफत!

'सेव्हिंगही आणि ITR फायलिंगही. YONO अॅपवर Tax2winसह आपण आपला ITR मोफत फाईल करु शकता', असं ट्वीट SBI ने केलं आहे.

SBIची खातेदारांना मोठी भेट, ITR फाईल करा एकदम मोफत!
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:56 PM

मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या खातेदारांना मोठी भेट देऊ केली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांना योनो (YONO) अॅपद्वारे आयकर परतावा अर्थात ITR भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. बँकेनं ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत ITR फाईल केला नसेल आणि तुम्ही SBIचे ग्राहक असाल तर YONO अॅपद्वारे तुम्ही ITR फाईल करु शकता. (SBI customers will be able to file ITR for free from YONO app)

‘सेव्हिंगही आणि ITR फायलिंगही. YONO अॅपवर Tax2winसह आपण आपला ITR मोफत फाईल करु शकता’, असं ट्वीट SBI ने केलं आहे. तसंच तुम्ही CA चीही मदत घेऊ शकता. पण त्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारणी केली जाईल आणि हे शुल्क 199 रुपयांपासून सुरु होते. जर तुम्हाला ITR फाईल करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही +91 9660996655 या क्रमांकावर कॉल करुन मदत घेऊ शकता. त्याचबरोबर support@tax@win.in यावर ईमेल करु शकता.

ITR कशाप्रकारे फाईल कराल?

SBI बँकेनं दिलेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम तुम्हाला YONO SBI अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर शॉप अॅन्ड ऑर्डरवर जाल. पुढे टॅक्स अॅन्ड इन्व्हेस्टमेंट वर जाल. तिथे तुम्हाला Tax2win पाहायला मिळेल. त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

तासाभरात 60,395 ITR फाईल

Income tax department ने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत 6 लाख 90 हजार 617 जणांना ITR फाईल केलं आहे. यातील 60 हजार 395 ITR तर शेवटच्या एका तासात फाईल झाले आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 साठी 26 डिसेंबरपर्यंत एकूण 4 कोटी 15 लाख ITR फाईल झाले आहेत.

संबंधित बातम्या: 

टीव्ही आणि फ्रीज आताच खरेदी करा, नव्या वर्षात ‘इतक्या’ किंमती वाढणार

घर भाड्याने दिलं आहे तर आधी वाचा Income Tax चे नियम, नाहीतर होईल नुकसान

SBI customers will be able to file ITR for free from YONO app

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.