SBI चा कोट्यवधी ग्राहकांना झटका, महिन्यात ATM मधून फक्त 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार

बेसिक सेव्हिंग्ज अकाऊंट असलेल्या खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. SBI free atm withdrawals

SBI चा कोट्यवधी ग्राहकांना झटका, महिन्यात ATM मधून फक्त 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार
SBI
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 1:14 PM

नवी दिल्ली: आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील बँका गरिबांच्या खात्यांमधून सेवा शुल्काच्या नावाखाली पैसे कपात करत असल्याचं समोर आलेलं आहे. पीएनबी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या सेव्हिग्ज खातेधारकांच्याकडून पैसे वसूल करणार असल्याचं समोर आलं आहे. बेसिक सेव्हिंग्ज अकाऊंट असलेल्या खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात 4 वेळा विनाशुल्क पैसे काढता येणार आहेत. त्याशिवाय अतिरिक्त वेळा पैसे काढल्यास 15 रुपये आणि त्यावर जीएसटी शुल्क देखील द्यावं लागणार आहे. स्टेट बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी हा झटका मानला जातोय. ( SBI gave four free atm withdrawals to bsbd accounts charge levied on fifth transaction)

लाईव्ह मिंट या पोर्टलनं दिलेल्या बातमीनुसार बेसिक सेव्हिंग्ज खातेधारक कोणत्याही एटीएममधून चार वेळा मोफत पैसे काढू शकतो. त्यानंतर एसबीआयच्या एटीएमवरुन पैसे काढले तरी त्याला 15 रुपये आणि जीएसटी शुल्क द्यावं लागणार आहे. हा नियम 1 जुलै पासून लागू होणार आहे.

बेसिक सेव्हिंग्ज खाते नेमकं काय?

बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवर आरबीआयच्या नियमानुसार सूट दिली जाते. हे झिरो बॅलन्स अकाऊंट असतं. हे खाते कोणीही काढू शकते. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागत नाही. खातेधारकांना एटीएम, इंटरनेट बँकिंग, फंड ट्रान्सफर, केंद्र राज्य सरकारांकडून आलेले अनुदानाचे चेक डिपॉझिट करणे इतर सुविधा असतात. ही सेवा फ्री असते.

एसबीआयनं 308 कोटी कमावले

आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार एसबीआय़कडील बीएसबीडी खातेधारकांची संख्या 12 कोटी आहे. या खात्यामधून सर्व्हिसेसे च्या नावाखाली 9.9 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.बँकाकडून छोटी छोटी रक्कम कपात केली जात असते. त्याची बेरिज केल्यास अंतिम रक्क मोठी असते. आयआयटी बॉम्बेच्या एका रिपोर्टनुसार स्टेट बँक ऑफ इंडियानं बीएसबीडी खातेधारकांच्या खात्यातून गेल्या सहा वर्षात 308 कोटी रुपये कमावले आहेत.

संबंधित बातम्या:

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे 

PNB बँकेच्या ‘या’ सुविधेमुळे पैसे राहणार सुरक्षित, ATM कार्डच्या वापराबद्दल लाँच केले नवे फिचर 

(SBI gave four free atm withdrawals to bsbd accounts charge levied on fifth transaction)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.