SBI Alert : आज UPI Payment नाही करू शकणार SBI यूजर्स, बँकेची महत्त्वाची माहिती
सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचे खाते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर आज तुम्ही 14 मार्चला यूपीआय पेमेंट करू शकणार नाही.
SBI Alert : अलिकडच्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटचा ट्रेंड मोठ्या वेगवान वाढला आहे. विशेषत: कोरोना युगात, यूपीआय (UPI Transaction) पासून शहरातून दुसऱ्या गावात व्यवहार वाढले आहेत. पूर्वी, जिथे युपीआय पेमेंट (UPI Payment) फक्त मोठ्या दुकानांपुरते मर्यादित होते, ते आता लहान दुकानांमध्ये, चहाचे दुकान आणि पाणीपुरीपर्यंतही पोहोचले आहे. जवळजवळ प्रत्येक बँकेचे ग्राहक युपीआय पेमेंटचा वापर करतात. (sbi important notice sbi users cannot do upi payment today on 14th march due to online platform upgradation)
सध्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुमचे खाते एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर आज तुम्ही 14 मार्चला यूपीआय पेमेंट करू शकणार नाही. यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय वापरकर्त्यांना (SBI Users) अडचण येऊ शकते. देशातील या बड्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) संबंधित माहिती (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे.
कारण काय आहे?
एसबीआयने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी बँक ग्राहकांच्या चांगल्या सोयीसाठी बँक आपलं यूपीआय प्लॅटफॉर्म सुधारत आहे. 14 मार्च रोजी झालेल्या अपग्रेडमुळे एसबीआय ग्राहकांना बँकेचा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येऊ शकतात असे बँकेने म्हटले आहे. तर यावर बँकेने पर्यायही सांगितले आहेत.
We request our esteemed customers to bear with us as we work towards improving our services to provide for an uninterrupted banking experience.#YONOLite #NetBanking #Banking #ImportantNotice pic.twitter.com/nZGRdRCFK7
— State Bank of India (@TheOfficialSBI) March 13, 2021
या सेवांचा घेऊ शकता लाभ…
यावेळी एसबीआय वापरकर्ते योनो अॅप (Yono App), योनो लाइट अॅप (Yono Lite App), नेट बँकिंग (SBI Net banking) किंवा एटीएम (ATM) वापरू शकतात अशीही माहिती बँकेने दिली आहे. अपग्रेडमुळे तुम्हाला यूपीआय सेवा वापरण्यात अडचण येत असल्यास तुम्ही या सेवा वापरू शकता.
15 आणि 16 रोजीदेखील बँकिंग सेवा होतील प्रभावित
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. संपामुळे 15 आणि 16 मार्च रोजी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहिल्यास बँक शाखांचे कामकाज ठप्प होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असेही म्हटले आहे की या संपामुळे बँकेच्या कामावर परिणाम होऊ शकेल. (sbi important notice sbi users cannot do upi payment today on 14th march due to online platform upgradation)
संबंधित बातम्या –
Petrol Diesel Price : ऐन महागाईत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं? वाचा आजचे ताजे दर
LIC ची प्रसिद्ध पॉलिसी, दरवर्षी 2500 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 5 लाखांचा फायदा
कोणतीही गुंतवणूक न करता शेतकऱ्याला वर्षाकाठी मिळणार 36,000 रुपये; नेमकी योजना काय?
(sbi important notice sbi users cannot do upi payment today on 14th march due to online platform upgradation)