SBI ने 44 कोटी ग्राहकांसाठी 2 महत्त्वाचे नंबर केले जारी, त्वरित तपासा
एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी केलेत. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की घरी राहा, सुरक्षित राहा. आम्ही तुमच्या सेवेसाठी तिथे आहोत.

नवी दिल्ली : ज्यांचे SBI मध्ये खाते आहे, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी संपर्कविरहित(contactless) सेवा सुरू केलीय. आता वापरकर्ते घरी बसून फोनवर बँकेशी संबंधित अनेक कामे करू शकतील. बँकेने ट्विट करून या नंबरची माहिती दिली आहे.
SBI ने टोल फ्री क्रमांक केले जारी
एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक जारी केलेत. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की घरी राहा, सुरक्षित राहा. आम्ही तुमच्या सेवेसाठी तिथे आहोत. एसबीआय तुम्हाला संपर्कविरहित (contactless) सेवा देते, जी तुम्हाला तुमच्या तत्काळ बँकिंग गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. आमच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा.
Stay safe at home, we are there to serve you. SBI provides you a contactless service that will help you with your urgent banking needs.
Call our toll free number 1800 112 211 or 1800 425 3800.#SBIAapkeSaath #StayStrongIndia #SBI #StateBankOfIndia #IVR #TollFree pic.twitter.com/oinxjFJnZv
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 18, 2021
या सर्व सुविधा एका फोनवर उपलब्ध असतील
एसबीआयने आपल्या ट्विटसह एक व्हिडीओ जारी केलाय. असे सांगण्यात आले आहे की, या नंबरवर कॉल करून घरी बसलेल्या ग्राहकांना कोणत्याही सेवांचा लाभ घेता येईल. व्हिडीओनुसार, खाते शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांसाठी या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता, एटीएम स्विच ऑन किंवा ऑफ करू शकता, एटीएम पिन किंवा ग्रीन पिन जनरेट करू शकता, नवीन एटीएमसाठी अर्ज करू शकता. SBI चे 44 कोटी पेक्षा जास्त ग्राहक आहेत.
हे नंबर कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका
बँकेने म्हटले आहे की, बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक किंवा त्याचे छायाचित्र घेऊनही आपली माहिती लीक होण्याचा धोका आहे. यासह आपले खाते देखील पूर्णपणे रिक्त होऊ शकते.
संबंधित बातम्या
‘या’ शेअरची किंमत 99 वरून 309 रुपयांपर्यंत पोहोचली, 1 वर्षात 200% पेक्षा जास्त परतावा
EPFO च्या वेबसाईटवर वारंवार पासवर्ड टाकण्याची झंझट दूर; ‘या’ अॅपवर एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती
SBI issues 2 key numbers for 44 crore customers, check now