जास्त जनधन बँक खाती असलेल्या राज्यांतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट: एसबीआय

पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खात्यांची संख्या आणि या खात्यांमधील शिल्लक रक्कमेमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. भारत आता फायनान्शिअल इनक्लूजन मेट्रिक्समध्ये चीनच्या पुढे आहे. मात्र, आगामी काळात शाखाविरहीत बीसी (बिझनेस करस्पॉन्डंट) मॉडेल मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जास्त जनधन बँक खाती असलेल्या राज्यांतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट: एसबीआय
जनधन खाते
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:14 AM

नवी दिल्ली: देशातील ज्या राज्यांमध्ये जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत, त्याठिकाणी गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे निरीक्षण भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अहवालात नोंदवण्यात आले आहे. जास्त प्रमाणात जनधन खाती असलेल्या राज्यांमध्ये दारु आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशभरातील बँकांनी प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) अंतर्गत खातेदारांना मोफत अपघात विमा संरक्षण देणारी 31.67 कोटी RuPay डेबिट कार्ड जारी केली आहेत.

एसबीआयच्या अहवालानुसार, पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खात्यांची संख्या आणि या खात्यांमधील शिल्लक रक्कमेमुळे गुन्हेगारीत घट झाली आहे. भारत आता फायनान्शिअल इनक्लूजन मेट्रिक्समध्ये चीनच्या पुढे आहे. मात्र, आगामी काळात शाखाविरहीत बीसी (बिझनेस करस्पॉन्डंट) मॉडेल मजबूत करणे महत्त्वाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

43.76 कोटी जनधन खाती उघडली

केंद्रीय वित्त मंत्रालयाने सांगितले की, ऑगस्ट 2014 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 43.76 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली आहेत. मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक प्रौढ नागरिकाला बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेत 21 ऑक्टोबर 2021 पर्यंत जन-धन खातेधारकांना मोफत अपघात विमा संरक्षण देणारी 31.67 कोटी रूपे डेबिट कार्ड जारी करण्यात आली आहेत.

दोन लाखांचा अपघात विमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जन-धन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती आणि काही दिवसांनी ती लागू करण्यात आली. 2018 मध्ये, सरकारने ‘प्रत्येक कुटुंबा’ऐवजी ‘प्रत्येक प्रौढ नागरिक’ला बँकिंग जाळ्यात आणण्याच्या उद्दिष्टासह जन-धन योजना 2.0 ही सुविधा सुरू केली. RuPay डेबिट कार्डवर मोफत अपघात विमा संरक्षण देखील दुप्पट करून 2 लाख रुपये करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या मार्च 2015 अखेर 14.72 कोटी होती, जी ऑक्टोबर 2021 मध्ये वाढून 43.76 कोटी झाली. सुमारे 55 टक्के खातेदार महिला आहेत.

संबंधित बातम्या:

PM Jandhan Account | पंतप्रधान जनधन खाते योजना नेमकी काय? फायदे कोणते? पाहा स्पेशल रिपोर्ट

Jandhan Account: ‘या’ सहा बँकांमध्ये जनधन खाते आहे का, मग बॅलन्स कसा चेक कराल?

PMJDY: 43.04 कोटी जन धन बँक खाती 7 वर्षांत उघडली, जाणून घ्या त्यांच्यात किती पैसे जमा?

‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.