SBI Alert : एसबीआयचे ग्राहक आहात? ऑनलाइन-ऑफलाइनसंदर्भात बँकेनं दिलं महत्त्वाचं अपडेट
शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्यानं बँका बंद राहणार आहेत. मात्र यादरम्यान ५ तासांपर्यंत एसबीआयची ग्राहक इंटरनेट बँकिंग सर्व्हिस(Internet Banking), योनो(Yono), योनो लाइट (Yono Lite), यूपीआय (UPI) आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) या सेवाही बंद राहणार आहेत.
मुंबई : देशातली सर्वात मोठी बँक एसबीआय(State Bank Of India)चे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सुट्टी असल्यानं बँका बंद राहणार आहेत. मात्र यादरम्यान ५ तासांपर्यंत एसबीआयची ग्राहक इंटरनेट बँकिंग सर्व्हिस(Internet Banking), योनो(Yono), योनो लाइट (Yono Lite), यूपीआय (UPI) आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) या सेवाही बंद राहणार आहेत. त्यामुळे त्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही.
300 मिनिटांचा अवधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मते, ग्राहक साधारणपणे 300 मिनिटांपर्यंत एसबीआयशी संबंधित ऑफलाइन-ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. हा 300 मिनिटांचा अवधी शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांसाठी असेल.
‘या’ सेवा राहणार बंद जर तुमचं एसबीआयमध्ये खातं असेल तर विविध सेवा जसं, की इंटरनेट बँकिंग सर्व्हिस, योनो, योनो लाइट, यूपीआय आणि मोबाइल बँकिंग या सेवा वापरता येणार नाहीत. म्हणजेच कोणतेही व्यवहार यामाध्यमातून करता येणार नाहीत.
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better Banking experience. pic.twitter.com/LZsuqO2B0D
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 10, 2021
सहकार्याचं आवाहन आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केलं आहे, की या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करावं. अधिकाधिक चांगली सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत. 11 डिसेंबर रात्री 11:30पासून 12 डिसेंबर सकाळी 04:30 (300 मिनिटं)पर्यंत सेवा सुधार काम (Maintenance) सुरू असेल.
एटीएममधून काढता येणार पैसे यादरम्यान INB/Yono/Yono Lite/Yono Business/UPI उपलब्ध नसेल. मात्र एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एसबीआयच्या देशभरातल्या 22 हजारहून अधिक शाखा आणि 57 हजार 889हून अधिक एटीएम नेटवर्क आहे. SBIच्या इंटरनेट बँकिंग सेवा 8.5कोटी लोक वापरतात आणि मोबाइल बँकिंग 1.9 कोटी लोक वापरतात. तर योनोवर नोंदणी केलेल्या ग्राहकांची संख्या 3.45 कोटीच्या वर आहे.