ज्येष्ठ नागरिक रेल्वेच्या सवलतींपासून वंचित; 4 कोटी जणांकडून पूर्ण भाड्याची वसुली

कोरोना काळात 2020 पासून रेल्वेने आपल्या सर्व योजना रद्द केल्या होत्या. याचा मोठा फटाक हा ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र कोरोना काळात या सर्व सवलती बंद असल्याने वृद्धाना रेल्वेने प्रवास करताना पूर्ण भाडे द्यावे लागले.

ज्येष्ठ नागरिक रेल्वेच्या सवलतींपासून वंचित; 4 कोटी जणांकडून पूर्ण भाड्याची वसुली
रेल्वे
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 7:30 AM

नवी दिल्ली : कोरोना काळात 2020 पासून रेल्वेने आपल्या सर्व योजना रद्द केल्या होत्या. याचा मोठा फटाक हा ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र कोरोना काळात या सर्व सवलती बंद असल्याने वृद्धाना रेल्वेने प्रवास करताना पूर्ण भाडे द्यावे लागले. कोरोना काळात जवळपास चार कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. त्या सर्वांकडून भाड्याचे पूर्ण पैसे वसूल करण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारांतर्गंत ही माहिती मागवली होती.

पुरुषांना 40 तर महिलांना 50 टक्के सूट  

ज्येष्ठ नागरिक पुरुषाला रेल्वेमधून प्रवास करताना भाड्यात 40 टक्के  सूट देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिक महिलेला भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 58 वर्षांपेक्षा अधिक असावे, तर पुरुषाचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असावे लागते. कोरोना काळात रेल्वेने आपल्या सर्व योजना रद्द केल्या होत्या, त्यामुळे या काळात वृद्धांना पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागला.

2017 पासून निर्णय ऐच्छिक

दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करताना भाड्यामध्ये सवलत दिली जावी की नाही, यामध्ये देखील दोन मतप्रवाह आहेत. मध्यतंरी रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वृद्धांना देण्यात येणारी भाडे सवलत बंद करावी असा विचार देखील मांडण्यात आला. या प्रस्तावावर विचार करण्यासाठी रेल्वेच्या वतीने 2016 ला एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर 2017 पासून भाड्यात सूट हवी आहे की नको हे ऐच्छिक करण्यात आले.

संबंधित बातम्या 

शेअर बाजार कोसळला; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 5.4 लाख कोटींचा फटका

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ‘एनपीएस’ ठरते वरदान; जाणून घ्या काय आहे योजना, कशी कराल गुंतवणूक?

ई-श्रम पोर्टलवर 8.43 कोटी कामगारांनी केली नोंदणी; जाणून घ्या काय आहेत फायदे?

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.