Stock Market Update: सेन्सेक्स म्हणतंय,”थांबायचं नाय आता थांबायचं नाय,घसरायचंच हाय आता घसरायचंच हाय!”,3 लाख कोटी पाण्यात
आज (शुक्रवार) सेन्सेक्स मध्ये 1000 हून अधिक अंकांची घसरण झाली. निफ्टी 16200 च्या दरम्यान बंद झाला. शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली आणि प्रत्येत क्षेत्रात घसरण दिसून आली.
नवी दिल्ली: देशांतर्गत शेअर बाजारात (SHARE MARKET) विक्रीचा दबाव दिसून आला. जागतिक अर्थपटलावरील (ECONOMIC AFFAIR) प्रतिकूल घडामोडींमुळे सेन्सेक्स व निफ्टी मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. आज (शुक्रवार) सेन्सेक्स मध्ये 1000 हून अधिक अंकांची घसरण झाली. निफ्टी 16200 च्या दरम्यान बंद झाला. शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून आली आणि प्रत्येत क्षेत्रात घसरण दिसून आली. निफ्टी वर बँक आणि फायनान्शियल निर्देशांकात 1.7 टक्के आणि 2.2 टक्के घसरण झाली. तर, आयटी निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. एफएमसीजी, ऑटो, मेटल, फार्मा आणि रिअल्टी सहित सर्व निर्देशांक घसरणीसह बंद झाले. आज सेन्सेक्स (SENSEX) मध्ये 1017 अंकांच्या घसरणीसह 54,303.44 वर पोहोचला. निफ्टी 276 अंकांच्या घसरणीसह 16202 अंकांवर बंद झाला.
घसरणीचे-वधारणीचे शेअर्स
आज सर्वाधिक घसरणीच्या शेअर्समध्ये कोटक बँक KOTAKBANK, बजाज फायनान्स BAJFINANCE, टाटा स्टील TATASTEEL, एचडीएफसी HDFC, रिलायन्स RELIANCE, विप्रो WIPRO आणि इन्फोसिस INFY समाविष्ट आहे. बाजारातील घसरणीमुळे बीएसई लिस्टेड (सूचीबद्ध) कंपन्यांचा मार्केट कॅपमध्ये 3.25 लाख कोटींची घसरण झाली आहे.
LIC शेअर नीच्चांकी स्तरावर
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण दिसून येत आहे. आज शेअर बाजारात सर्वाधिक घसरण नोंदविली गेली. एलआयसी घसरणीचा सलग 9 वा दिवस आहे आणि घसरणीसह एलआयसी शेअर 710 रुपयांवर पोहोचला आहे. काल (गुरूवार) शेअर 722 रुपयांवर बंद झाला होता. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर शेअरमध्ये सातत्यानं घसरण होत आहे.
मार्केट अपडेट्स मुख्य वैशिष्ट्ये
- एलआयसी शेअर्स घरसणीचा सलग 9 वा दिवस
- आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरण
- गुंतवणुकदारांचे तीन लाख कोटी पाण्यात
- शेअर बाजारात विक्रीचा ओघ कायम
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेने Kotak Mahindra Bank 50 लाख रुपयांहून अधिक ठेवींवरील बचत खात्यातील व्याज दरात 0.50 टक्क्यांहून अधिक वाढीची घोषणा केली. सध्या व्याजदर 4 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.