Sensex Update : शेअर बाजार उघडताच मोठी घरसण, बाजार इतक्या अंकानी पडला

शेअर बाजाराने आज सकाळच्या प्री-ओपनिंग सत्रात डुबकी घेतली. प्री-ओपनिंगमध्ये म्हणजे सकाळी 9 वाजता, बीएसई सेन्सेक्स 130 अंकांनी घसरला होता आणि 65,747 च्या पातळीवर व्यवहार करत होता. NSE निर्देशांक निफ्टी देखील 172 अंकांच्या घसरणीसह 19,499 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात म्हणजे बुधवारी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 551 अंकांनी घसरला होता.

Sensex Update : शेअर बाजार उघडताच मोठी घरसण, बाजार इतक्या अंकानी पडला
सेंसेक्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 10:14 AM

मुंबई : कमकुवत जागतिक संकेत तसेच इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या घसरणीसह उघडला. बाजार उघडताच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा सेन्सेक्स (Sensex Update) 422 अंकांनी घसरला आणि सकाळी 9.15 वाजता तो 65,454 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. याशिवाय नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या बेंचमार्क निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. बाजार उघडण्याच्या वेळी तो 111 अंकांनी घसरून 19,559 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बुधवारीही शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता. लहान गुंतवणूक दारांना याचा मोठा फटका बसला आहे.

बाजार उघडल्यावर स्टॉकची स्थिती

विप्रो, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिड कॉर्प हे बाजार सुरू होताच निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरले, तर बजाज ऑटो, एलटीआयमिंडट्री, इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि डिव्हिस लॅब्स वधारलेल्यांमध्ये होते.

प्री-ओपनिंगमध्येच बाजार घसरला

शेअर बाजाराने आज सकाळच्या प्री-ओपनिंग सत्रात डुबकी घेतली. प्री-ओपनिंगमध्ये म्हणजे सकाळी 9 वाजता, बीएसई सेन्सेक्स 130 अंकांनी घसरला होता आणि 65,747 च्या पातळीवर व्यवहार करत होता. NSE निर्देशांक निफ्टी देखील 172 अंकांच्या घसरणीसह 19,499 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मागील सत्रात म्हणजे बुधवारी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 551 अंकांनी घसरला आणि अखेरीस 65,877.07 च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा बेंचमार्क निफ्टी (NIFTY) देखील 140.4 अंकांच्या तीव्र घसरणीसह 19700 च्या खाली म्हणजेच 19671.10 च्या पातळीवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

या कंपन्या आजच्या F&O बंदी यादीत आहेत

मनी कंट्रोलच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात नरमाईचा कल आहे. आशियाई बाजार एक टक्क्याहून अधिक कमकुवत झाले. NSE ने बलरामपूर चिनी मिल्स, डेल्टा कॉर्प, GNFC, हिंदुस्तान कॉपर, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, इंडिया सिमेंट्स, मन्नापुरम फायनान्स, MCX इंडिया आणि SAIL यांना 19 ऑक्टोबरच्या F&O बंदी यादीत कायम ठेवले आहे.  BHEL ला या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.