Hotel Service Charge News : हॉटेलच्या बिलात जोडला सर्व्हिस चार्ज! मग ठोका दावा, करा तक्रार शिकवा धडा

Complaint against Service Charge : सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेल तुमची लुबाडणूक करत असेल तर अशांना धडा शिकवा. तक्रार कुठे आणि कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगतो

Hotel Service Charge News : हॉटेलच्या बिलात जोडला सर्व्हिस चार्ज! मग ठोका दावा, करा तक्रार शिकवा धडा
शिकवा धडा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 1:18 PM

Service Charge News : वाढत्या महागाईने हॉटेलिंगचा आनंद हिरावून घेतला आहे. त्यातच सेवा शुल्कच्या (Service Charge) नावाखाली अनेक हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट(Restaurant) सरळसरळ लूट करतात. याविरोधात ग्राहकांनी अनेकदा ट्विटर, फेलसबूक, इन्स्टांग्राम यांच्यावर भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. फूड क्वालिटीच्या नावाखाली सर्रास होणा-या या लुटीची खबर नकुतीच केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने (Consumer Affairs Minister) घेतली. ग्राहकांना लुबडण्याचा हा प्रकार त्वरीत बंद करण्याचा इशारा मंत्रालयानं दिला आहे. एवढ्यावरच न थांबता मंत्रालयाने ग्राहकांना या अनुचित प्रकाराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि थेट संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेलवर तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. रेस्ट्रॉरंट आणि हॉटेलविरोधात ग्राहकाला 1915 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच NCH या मोबाईल अॅपवर तक्रार ही दाखल करता येईल. तेव्हा तुमच्या बिलात सर्व्हिस चार्ज जोडल्याचे लक्षात आले तर अगोदर हॉटेल चालक मालकाला ते कमी करण्याची विनंती करा, अन्यथा त्याला धडा शिकवा.

स्वतःहून शुल्क लादू नका

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA),हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा शुल्क आकारण्यासंदर्भात अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स अन्न बिलामध्ये स्वयंचलितपणे किंवा डीफॉल्टनुसार सेवा शुल्क ग्राहकांवर लादू नयेत. एवढेच नव्हे तर कोणत्याही इतर गोंडस नावाचा वापर करुन ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करता येणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही आणि सेवा शुल्क ऐच्छिक आहे. ग्राहकाची इच्छा असल्यास तो सेवा शुल्क देईल अन्यथा देणार नाही. त्याच्या विवेकाला ते पटत असेल तर तो त्याचा निर्णय घेईल. पण त्याला जबरदस्ती करता येणार नाही असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. सोमवारी याविषयीच्या मार्गदर्शक सूचना प्राधिकरणाने देशभरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

कुठे कराल तक्रार ?

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने, ग्राहकांसाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन विकसीत केली आहे. याठिकाणी ग्राहकाला तक्रार नोंदविता येईल. 1915 यावर संपर्क साधता येईल अथवा NCH हे अॅप मोबाईलमधील गुगल स्टोअरमधून डाऊनलोड करता येईल. ग्राहकाला अनुचित व्यापार प्रथेविरोधात आवाज उठविता येईल. त्याला तक्रार करण्यासाठी ई-दाखिल पोर्टलवर www.edaakhil.nic.in या संकेतस्थळावर थेट तक्रार नोंदविता येईल. याव्यतिरिक्त ग्राहक सीसीपीए(CCPA) चौकशीचे मागणी करु शकतो. तसेच जिल्हाधिका-यांकडेही तक्रार नोंदवू शकतो. अथवा ccpa@nic.in वर ही त्याला ई-मेल द्वारे तक्रार करता येईल.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....