आर्यन खानच्या व्हिस्की कंपनीला अमेरिकेत अवॉर्ड, किती आहे एका बाटलीची किंमत

शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी २०२३ मध्ये एक कंपनी लॉन्च केली होती. ही एक व्हिस्की कंपनी आहे. जी देशात सध्या तीन राज्यांमध्ये आहे. त्यांच्या या कंपनीला आता न्यूयॉर्कमध्ये बेस्ट व्हिस्कीचा किताब मिळाला आहे. जगात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या व्हिस्कींपैकी ही एक आहे. एका बाटलीची किंमत किती आहे जाणून घ्या.

आर्यन खानच्या व्हिस्की कंपनीला अमेरिकेत अवॉर्ड, किती आहे एका बाटलीची किंमत
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 10:24 PM

शाहरुख खान केवळ अभिनेताच नाही तर तो एक बिझनेस मॅन देखील आहे. चित्रपट निर्मिती सोबत त्याने आता दारूचा व्यवसायही सुरु केला आहे. अलीकडेच त्यांच्या व्हिस्की कंपनी डी’यावॉलला बेस्ट व्हिस्कीचा किताब मिळाला आहे. शाहरुख आणि आर्यन खानच्या डी’यावॉलला हे शीर्षक मिळाले आहे. एका बाटलीची किंमत किती आहे? तुम्हाला कदाचित हे माहित नसेल तर आज आम्ही तुम्हाला ते सांगणार आहोत.

शाहरुख खान आणि आर्यन खानच्या स्कॉच व्हिस्की डी’यावोले याला 2024 न्यूयॉर्क वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटिशन (NYWSC) मध्ये त्याच्या फ्लॅगशिप व्हिस्की, इनसेप्शनसाठी ‘बेस्ट ओव्हरऑल स्कॉच’ तसेच ‘बेस्ट ऑफ क्लास’ मिश्रित माल्ट स्कॉच व्हिस्की पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही व्हिस्की भारतात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकमध्ये उपलब्ध आहे आणि तिच्या 750 मिली बाटलीची किंमत 9,000 ते 9,800 रुपये आहे.

2023 मध्ये केली होती लाँच

ही व्हिस्की 2023 मध्ये लाँच करण्यात आली होती. ती भारतातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध नाही. हा ब्रँड फक्त गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात उपलब्ध आहे. मात्र लवकरच तो दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणामध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या व्हिस्कीमध्ये डार्क चॉकलेट, ड्रायफ्रुट्स सारखे फ्लेव्हर असतात.

हा पुरस्कार जिंकणे खूप मोठी गोष्ट – आर्यन खान

डी योवालचा सह-संस्थापक आर्यन खान म्हणाला की, हा पुरस्कार जिंकणे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे आमच्यासाठी प्रमाणीकरण आणि प्रेरणा दोन्ही आहे. गुणवत्ता आणि कारागिरीच्या बाबतीत आमचा ब्रँड हा जगातील सर्वोत्तम ब्रँड असल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by D’YAVOL (@dyavolworkshop)

आर्यन खान 27 वर्षांचा असून तो शाहरुख खान आणि गौरी खानचा सर्वात मोठा मुलगा आहे. त्याला एक बहीण आहे. जिचे नाव सुहाना खान आहे. त्याला आणखी एक भाऊ आहे. त्याचे नाव अबराम खान आहे, जो शाळेत शिकतोय. आर्यन चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत. शाहरुखचे प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या सिनेमात तो दिसू शकतो. याआधी आर्यन खानने इंडियन प्रीमियर लीग लिलावात आणि शाहरुखसाठी इतर इव्हेंटमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी काम केले होते.

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.