Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी 4 जूनसाठी केली होती भविष्यवाणी, पण 3 जून रोजी खरी ठरली

narendra modi share bazar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत शेअर बाजारासंदर्भात भविष्‍यवाणी केली होती. नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी येतील. या निकालानंतर भारतीय शेअर बाजारातील जुने सर्व विक्रम मोडले जातील.

Narendra Modi: नरेंद्र मोदी यांनी 4 जूनसाठी केली होती भविष्यवाणी, पण 3 जून रोजी खरी ठरली
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 4:24 PM

लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी येणार आहेत. त्यापूर्वी 1 जून रोजी विविध संस्थांनी केलेले एग्झिट पोल 1 जून रोजी जाहीर झाले. एग्झिट पोलचे निकाल आल्यानंतर पहिल्यांदा 3 जून रोजी शेअर बाजार उघडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. नरेंद्र मोदी यांनी 4 जून संदर्भात भविष्यवाणी केली होती. परंतु ही भविष्यवाणी एक दिवसापूर्वी म्हणजेच ३ जून रोजी खरी ठरली. एग्झिट पोलच्या निकालात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी सेंसेक्‍सने नवीन विक्रम केला. सेंसेक्स 2700 अंकापेक्षा जास्त वाढला. तसेच निफ्टीत 800 अंकांची वाढ झाली. सेंसेक्स रिकॉर्ड 76,738.89 वर तर निफ्टी 23,338.70 वर उघडला. शेअर बाजारातील या तेजीत CDSL साइट डाउन झाली.

नरेंद्र मोदी यांची भविष्‍यवाणी काय होती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत शेअर बाजारासंदर्भात भविष्‍यवाणी केली होती. नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी येतील. या निकालानंतर भारतीय शेअर बाजारातील जुने सर्व विक्रम मोडले जातील. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, निवडणूक निकालानंतर संपूर्ण आठवडाभर जबरदस्त ट्रेडीग होईल. प्रोग्रामिंगवाले हे मॅनेज करता करता थकून जातील.

अशी झाली अडचण

नरेंद्र मोदी यांनी 4 जून संदर्भात केलेली भविष्‍यवाणी 3 जून रोजीच खरी ठरली. या दिवशी सीडीएसएलची साईट डाऊन झाली. यामुळे ब्रोकींग प्‍लेटफॉर्म Groww, Angel One आणि Zerodha मधील गुंतवणूकदार आपले शेअर विकू शकले नाही. काही ब्रोकरींग प्‍लेटफॉर्ममधील शेअर आणि F&O पॉजिशन दाखवत नव्हते. काही वेळाने या समस्येचे निराकरण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर मीम्स

शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आणि ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक अडचणींबाबत सोशल मीडियावर बरेच मीम्स शेअर आले. मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही इथे टीपिन मागत राहाल आणि तिथे कोणीतरी माझा गेम खेळेल’. दुसऱ्या यूजरने लिहिले, भारतीय शेअर बाजारातील दलाल मोठ्या अंतरानंतर पुन्हा अयशस्वी झाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.