दिवाळीपूर्वीच बाजारात धुमधडाम; मोठ्या घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टीने गुंतणूकदारांच्या डोळ्यात आणले पाणी

Share Market Crash : सलग चौथ्या दिवशी आणि आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात शेअर बाजाराला सूर गवसला नाही. सणासुदीपूर्वीच बाजारातील या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचे डोळे पाणावले. सेन्सेक्समध्ये आज सकाळी 500 अंकाची घसरण दिसली. तर निफ्टी 24,704.15 अंकाच्या मागे-पुढे खेळत आहे.

दिवाळीपूर्वीच बाजारात धुमधडाम; मोठ्या घसरणीसह सेन्सेक्स-निफ्टीने गुंतणूकदारांच्या डोळ्यात आणले पाणी
बाजारात मोठी घसरण
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 11:44 AM

आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजाराला पुन्हा एकदा घसरणीचा फटका बसला. आज बीएसई सेन्सेक्स 276 आणि निफ्टी 93 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. आयटी, ऑटो स्टॉक्समध्ये जोरदार घसरण दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये घसरण आली. बाजारात विक्री सत्रामुळे घसरण वाढली. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 800 अंकांहून अधिकने आपटला. BSE Sensex 196 अंकांच्या घसरणीसह 80,826 अंकांच्या जवळपास तर निफ्टीत 52.20 अंकांची घसरण झाली. निफ्टी सध्या 24,704.15 अंकाच्या मागे-पुढे खेळत आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने शेअरची विक्री करत असल्याने मोठा फटका बसल्याचे दिसून येते.

या शेअरवर जास्त परिणाम

सेन्सेक्सच्या 30 शेअर्समध्ये केवळ 5 तेजीत होते. इतर 25 शेअरमध्ये मोठी घसरण दिसली. तर निफ्टीच्या 50 शेअरमधील केवळ 7 तेजीत होते. तर 43 स्टॉकमध्ये घसरण दिसली. ॲक्सिस बँक 2.75 टक्के, आयशर मोटर्स 2.08 टक्के, विप्रो 1.79 टक्के, टीसीएस 0.59 टक्के, भारती एअरटेल 0.08 टक्के तर आयसीआयसीआय बँक 0.054 टक्क्यांसह अग्रेसर होती. तर श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, मारुती, टायटन, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, बीपीसीएल, बीईएल, अदानी एंटरप्रायजेसमध्ये घसरण दिसली.

हे सुद्धा वाचा

सर्वच सेक्टरच्या स्टॉकमध्ये घसरण

आजच्या व्यापारी सत्रात सर्वच क्षेत्रातील स्टॉकमध्ये घसरण दिसली. बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, एफएमसीजी, इंन्फ्रा, फार्मा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स सेक्टरमधील सेक्टरमध्ये घसरण दिसली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी घसरण दिसली. कालच्या घसरणीचे सत्र आजही कायम आहे. निफ्टी, सेन्सेक्स आणि बँक सेक्टरमध्ये घसरण दिसून आली. बाजार लाल रंगात न्हाऊन निघाला आहे.

बाजार उघडताच 5 लाख कोटींचे नुकसान

शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवरील सूचीबद्ध स्टॉक्सचे मार्केट कॅप 452 लाख कोटी रुपयांहून घसरले. गेल्यावेळी ते 457 लाख कोटी रुपये होते. आज बाजार सुरू होताच सेन्सेक्सच्या 30 शेअर्समध्ये केवळ 5 तेजीत होते. इतर 25 शेअरमध्ये मोठी घसरण दिसली. तर निफ्टीच्या 50 शेअरमधील केवळ 7 तेजीत होते. तर 43 स्टॉकमध्ये घसरण दिसली. गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अखेरच्या सत्रात सुद्धा बाजाराने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली.

Non Stop LIVE Update
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.