अवघ्या 20 रुपयांच्या शेअरची किंमत पोहोचली 161 रुपयांवर, एका वर्षात 700 टक्के रिटर्न्स
Share Market | अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स हा 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉक आहे. या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा मिळवून दिला आहे. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीच्या समभागाची किंमत अवघी 20 रुपये इतकी होती.
मुंबई: गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. अशा समभागांची किंमत साधारण 25 रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांना हे समभाग खरेदी करणे शक्य असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये असे अनेक पेनी स्टॉक आहेत. भविष्यात हे पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन देऊ शकतात. यापैकीच एक समभाग म्हणजे अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स (Arihant Superstructures)
सध्या शेअर बाजाराच्या निर्देशंकांनी विक्रमी टप्प्याला गवसणी घातली आहे. त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी पैसे गुंतवणारे लोक अक्षरश: मालामाल झाले आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये मुंबई बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा ओलांडेल, असे भाकीत वर्तविले जात आहे. अशावेळी आतापासूनच गुंतवणूक करुन चांगला फायदा पदरात पाडून घेण्याची संधी आहे.
अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सची वेगवान घोडदौड
अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स हा 2021 मधील मल्टीबॅगर स्टॉक आहे. या समभागाने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 700 टक्के परतावा मिळवून दिला आहे. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ही बांधकाम क्षेत्रातील कंपनी आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये या कंपनीच्या समभागाची किंमत अवघी 20 रुपये इतकी होती. मात्र, आता हीच किंमत वर्षभरात 161 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. या कालावधीत अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 704 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
निफ्टी रियल्टी निर्देशांकाशी तुलना केल्यास, निफ्टीने या कालावधीत 117% परतावा दिला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 83% वाढला आहे. अशा प्रकारे, या रिअॅल्टी स्टॉकने दोन्ही निर्देशांकांना मागे टाकले आहे.
वर्षभरात लाखाचे 8 हजार
एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सच्या स्टॉकमध्ये रु. 1,00,000 गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य वाढून रु. 8 लाख झाले असते. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स ही एक स्मॉलकॅप रिअल इस्टेट कंपनी आहे ज्याचा मुख्य भर परवडणारी घरे बांधण्यावर आहे. अरिहंत सुपरस्ट्रक्चर्सने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै-सप्टेंबर 2021 या कालावधीत 11.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्यावर्षी याच काळात कंपनीला 4.15 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. कंपनीची निव्वळ विक्री देखील 38% ने वाढून रु. 87.80 कोटी झाली आहे. जी गेल्यावर्षी याच तिमाहीत रु. 63.60 कोटी होती.
संबंधित बातम्या:
राकेश झुनझुनवालांनी ‘या’ दोन कंपन्यांच्या समभागावर वर्षभरात मिळवले 216 टक्के रिटर्न्स
अवघ्या 24 रुपयांच्या शेअरची किंमत झाली 2064 रुपये; गुंतवणूकदारांना बक्कळ फायदा